टीव्ही मालिकेसाठी अभिनेत्याने 600 कोटींचा चित्रपट नाकारला, आता आली पश्चातापाची वेळ

मात्र अशाही परिस्थिती चित्रपटाच्या निर्मात्यांकडून त्याचं कौतुक करण्यात आलं. इतका मोठा प्रोजेक्ट असूनही आदित्य आपल्या कमिटमेंटवर कायम असल्याने त्यांनाही आश्चर्य वाटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

टीव्हीवर काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याचं मोठ्या पडद्यावर काम करण्याचं स्वप्न असतं. अशात चांगल्या बॅनरचा किंवा बिग बजेट चित्रपट समोर आला तर मागील करार रद्द करण्याचीही तयारी असते. मात्र अभिनेता आदित्य देशमुख यांने आपली कटिबद्धता पूर्ण करण्यासाठी एक बिग बजेट चित्रपटाची ऑफर नाकारली. आता मात्र त्याला या निर्णयाचं दु:ख होत आहे. 

कोणता चित्रपट आणि कोणती भूमिका?
एका मुलाखतीमध्ये आदित्य देशमुख याने या गोष्टीचा खुलासा केला. नितेश तिवारी यांच्या  रामायण चित्रपटासाठी त्याने ऑडिशन दिलं होतं. यात त्याची निवडही झाली होती. या चित्रपटातील तरुणपणाच्या दशरथ यांची भूमिका त्याला ऑफर करण्यात आली होती. मात्र जेव्हा त्यांना ही भूमिका मिळाली, त्यापूर्वी आदित्यने सुहागन नावाच्या टीव्ही मालिकेसाठी तारखा दिल्या होत्या.

हे ही वाचा-अब मेरा समय आया है!... Kalki 2898 ADच्या टीझरसह अमिताभ बच्चन यांचा लुक चर्चेत

त्यामुळे इच्छा असतानाही त्यांना चित्रपटात काम करता आलं नाही. मात्र आता आदित्य देशमुख याने मालिकाही सोडली आहे. यानंतर त्याने पुन्हा चित्रपट निर्मात्यांची संपर्क केला, मात्र त्याच्या हातून संधी निघून गेली होती. मात्र अशाही परिस्थिती चित्रपटाच्या निर्मात्यांकडून त्याचं कौतुक करण्यात आलं. इतका मोठा प्रोजेक्ट असूनही आदित्य आपल्या कमिटमेंटवर कायम असल्याने त्यांनाही आश्चर्य वाटलं.  

Advertisement

600 कोटींचा प्रोजेक्ट...
नितेश तिवारी यांचा रामायण हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. याची सुरुवातीची गुंतवणूक 600 कोटींची मानली जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर रामाची भूमिका साकारणार आहे. तर साई पल्ली सीतेच्या भूमिकेत दिसेल. रामायण या जुन्या टीव्ही मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरूण  गोविल आता दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी एआर रेहमान संगीत देणार आहेत.