जाहिरात

अब मेरा समय आया है!... Kalki 2898 ADच्या टीझरसह अमिताभ बच्चन यांचा लुक चर्चेत

'कल्कि 2898 एडी' सिनेमाचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. सिनेमामध्ये अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. टीझरमध्ये जबरदस्त डायलॉग असल्याने प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अब मेरा समय आया है!...  Kalki 2898 ADच्या टीझरसह अमिताभ बच्चन यांचा लुक चर्चेत

Introducing Ashwatthama Kalki 2898 AD: बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) सिनेमाचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. टीझरमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा अतिशय दमदार लुक पाहायला मिळत आहे. कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) सिनेमाचे टीझर लाँच करून निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांच्या पात्राची खास झलक सिनेरसिकांना दाखवली. सोशल मीडियापासून ते यु-ट्यूबपर्यंत सिनेमाच्या टीझरवर युजर्संकडून लाइक व कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सिनेमामध्ये बिग बी अमिताभ बच्चन अश्वत्थामाची भूमिका साकारत आहेत. दिग्दर्शकाने त्यांचे पात्र दमदार अंदाजामध्ये प्रेक्षकांसमोर आणले आहे. दरम्यान साऊथ सिनेमांमधील बाहुबली 'प्रभास' आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या देखील सिनेमामध्ये प्रमुख भूमिका आहे.  

(नक्की वाचा : 18 वर्षांपूर्वी आमीर खानच्या मुलाची साकारली भूमिका, आता इतका हँडसम दिसतोय हा मुलगा)

बिग बींचे दमदार डायलॉग

कल्कि 2898 एडीच्या इंट्रोड्युसिंग अश्वत्थामा टीझर व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त डायलॉग ऐकायला मिळताहेत. टीझरमध्ये अमिताभ बच्चन म्हणताहेत की,"आता माझी वेळ आली आहे. माझ्या अंतिम लढाईची वेळ आली आहे". दुसरीकडे "तुम्ही कोण आहात?" असा प्रश्न टीझरमध्ये दिसणाऱ्या मुलाने विचारल्यानंतर बिग बी उत्तर देतात की,"द्वापर युगापासून प्रतीक्षा करतोय दहाव्या अवताराचा, द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा".

अशा प्रकारे बिग बी आपल्या आगामी सिनेमाद्वारे बॉक्सऑफिसवर कलेक्शनचे वादळ निर्माण करणार असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे टीझरचे पार्श्वसंगीत देखील अतिशय अप्रतिम आहे. सध्या सोशल मीडियावर केवळ 'कल्कि 2898 एडी' सिनेमाचीच चर्चा सुरू आहे.   

इंट्रोड्युसिंग अश्वत्थामा- कल्कि 2898 एडी 

इंट्रोड्युसिंग अश्वत्थामा कल्कि 2898 एडीच्या व्हिडीओवर सिनेरसिक मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताहेत. अमिताभ बच्चन यांचे डायलॉग ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो, अशी प्रतिक्रिया एका युजरने यु-ट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर केली आहे. आणखी एकाने कल्कि सिनेमाच्या टीझरला 10 पैकी 10 गुण दिले आहेत.  

(नक्की वाचा: साई पल्लवीनं केला 'शीला की जवानी' वर डान्स, फॅन्स म्हणाले, 'ही तर कतरिनापेक्षा भारी')

नाग अश्विन यांनी कल्कि 2898 एडी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार कमल हासन, अभिनेता प्रभास, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री दिशा पाटनी हे कलाकार चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  

(नक्की वाचा: EXCLUSIVE : 'आम्हाला कसलीही भीती नाही, मृत्यू...' CM शिंदेंच्या भेटीनंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया)

VIDEO: साताऱ्याची लढत उदयनराजेंसाठी किती सोपी किती कठीण? पाहा EXCLUSIVE मुलाखत

Switch To Dark/Light Mode
Previous Article
'जहांगिर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का?'; मुलाच्या नावावरील ट्रोलिंगनंतर चिन्मयचा मोठा निर्णय
अब मेरा समय आया है!...  Kalki 2898 ADच्या टीझरसह अमिताभ बच्चन यांचा लुक चर्चेत
Pankaj Tripathi sister's husband died on the spot in a horrific car accident
Next Article
पंकज त्रिपाठीला मोठा धक्का; भीषण कार अपघातात बहिणीच्या पतीचा जागीच मृत्यू