Ahan Shetty Girlfriend News: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या मुलाच्या अफेअरची चर्चा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत अहानचं नाव त्याचा बालपणीची मेत्रिण तानिया श्रॉफ हिच्यासोबत जोडलं जात होते. सुनील शेट्टी यांच्याप्रमाणेच अहान देखील आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात अडकेल अशी चर्चा देखील होती. मात्र या सर्व शक्यता आता धुसर झाल्या आहेत. कारण ताज्या रिपोर्ट्सनुसार, अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या माहिती समोर येत आहे.
तानियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अहान शेट्टी आता मराठी अभिनेत्री जिया शंकर हिच्यासोबत जोडले जात आहे. जिया शंकर हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहला आहे. 'बिग बॉस ओटीटी' मधून मिळाली तिला खरी प्रसिद्धी मिळाली. जिया शंकर रितेश देशमुखसोबत 'वेड' सिनेमातही झळकली होती.
(नक्की वाचा- Dharmendra Health Updates: सलमान, शाहरूख, गोविंदासह अनेक सेलिब्रिटी भेटीला, सनी देओलच्या टीमने सांगितलं...)
जिया शंकरने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, तिला अशा व्यक्तीसोबत प्रेम करायचे आहे, ज्याच्यासोबत ती लग्न करू शकेल. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जियाला अखेर अहानच्या रूपात तो योग्य व्यक्ती मिळाल्याचे बोलले जात आहे. टाईम्स नाऊने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अहान आणि जिया यांना अद्याप मीडिया किंवा चाहत्यांनी एकत्र पाहिलेले नाही. मात्र, मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या प्रेमाच्या अफवा चर्चा खूप वेगाने पसरत आहेत. दोघेही आपल्या प्रेमाची अधिकृत घोषणा करण्याची योग्य वेळेची वाट पाहत असल्याचं बोललं जात आहे.
अहानचे आगामी चित्रपट
अहान शेट्टीला शेवटचा 'तडप' या चित्रपटात दिसला होता. यानंतर त्याचे नाव अनेक प्रोजेक्ट्सशी जोडले गेले. काही दिवसांपूर्वीच त्याने 'बॉर्डर 2' नावाच्या चित्रपटाचे काम सुरू केले आहे, जो पुढील वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटात तो दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि सनी देओल यांच्यासोबत दिसणार आहे.