Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांनी या जगाचा निरोप घेतलाय, यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीय. सर्वसामान्यांसह राजकारणी ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अजित पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता सुरज चव्हाण यानंही अजित पवार यांच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केलीय.
सुरज चव्हाणची अजित पवारांसाठी भावुक पोस्ट
सुरज चव्हाणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की," मित्रांनो माझा देव चोरला आज, मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतंय…लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन
दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली"
(नक्की वाचा: Ajit Pawar Bodyguard: सावलीप्रमाणे अजित पवारांसोबत राहायचे, बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्या शेजाऱ्यांची मोठी मागणी)
अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.