Akhanda 2: Thaandavam Box Office Collection Day 1: ५ डिसेंबरला रणवीर सिंहच्या 'धुरंधर'शी दक्षिणेतील नंदमुरी बालकृष्ण याची 'अखंडा २ तांडवम' धडक देणार होती. मात्र काही कारणांमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला. मात्र आता १२ डिसेंबरला कपिल शर्मा याची 'किस को प्यार करू २' आणि 'अखंडा २' मध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. अखंडाने या चित्रपटाला मागे टाकलं आहे. दुसरीकडे धुरंधरच्या ओपनिंग कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर अखंडा २ च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने दोन्ही चित्रपटांना मागे टाकलं आहे.
अखंडा २ बॉक्स ऑफिस कलेक्शन - पहिला दिवस
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारींनुसार, अखंडा २ ने पहिल्याच दिवशी भारतात ३० कोटींची ओपनिंग केली. तर जगभरातील हा आकडा ३५.७५ कोटी इतकी झाली. या चित्रपटाने तेलुगूमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे, तर हिंदी, कन्नड, तमिळ आणि मल्याळममध्ये लाखोंची कमाई झाली आहे.
धुरंधरने ८ दिवसात किती कमावले
सैकनिल्कनुसार, पहिल्या दिवशी २८ कोटींची ओपनिंग करणाऱ्या धुरंधरचा आठव्या दिवसाचा आकडा ३२ कोटी आहे. ८ दिवसात या चित्रपटाचं भारतातील कलेक्शन २३९.२५ कोटी आहे. तर वर्ल्डवाइड कमाई ३५७.२५ कोटी आहे. तर चित्रपटाने इंडिया ग्रॉस २८७.२५ कोटींची कमाई केली आहे.
किस किस को प्यार करूला टाकलं मागे...
कपिल शर्माचा चित्रपट किस किस को प्यार करू २ बद्दल सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात केवळ १.७५ कोटींची कमाई केली. तर जगभरातील आकडा २.१ कोटी इतका आहे.
बजरंगी भाईजानच्या मुन्नीचा डेब्यू
सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली हर्षाली मल्होत्राने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे आणि ती नंदमुरी बालकृष्ण यांच्या 'अखंड २' (थांडवम) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तथापि, 'अखंड २' च्या सोशल मीडिया रिव्ह्यूबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटाला इंस्टाग्रामवर नकारात्मक रिव्ह्यू मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन काय असेल हे पाहणे बाकी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
