अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली ईस्टमध्ये आपल्या दोन आलिशान प्रॉपर्टी विकल्या आहेत. या प्रॉपर्टींच्या विक्रीतून त्याने चांगलाच नफा कमावला आहे. हा नफा पाहून कुणीही आश्चर्यचकीत व्हाल. अक्षय कुमारने आपले दोन फ्लॅट विकले आहेत. हे दोन्ही फ्लॅट त्याने 2017 साली खरेदी केले होते. दोन्ही फ्लॅट हे मोक्याची ठिकाणी होते. दोन्ही फ्लॅट ओबेरॉय रियल्टीच्या हाय-क्लास स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये आहेत. हा प्रोडोक्ट जवळपास 25 एकरमध्ये पसरलेला आहे. अक्षयच्या या दोन्ही घरांचा व्यवहार जून 2025 मध्ये झाला अशी माहिती प्रॉपर्टी प्लॅटफॉर्म स्क्वायर यार्ड्सने माहिती दिली आहे.
पहिल्या फ्लॅटबाबत माहिती
- क्षेत्रफळ: 1,101 चौरस फूट
- विक्री किंमत: 5.75 कोटी रुपये
- खरेदी किंमत (2017 मध्ये): 3.02 कोटी रुपये
- नफ्यात वाढ: सुमारे 90%
- या व्यवहारात 34.50 लाख रुपयांची मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) आणि 30,000 रुपयांची नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी) भरण्यात आले. या प्रॉपर्टीसोबत दोन कार पार्किंगची जागा देखील आहे.
दुसऱ्या फ्लॅटबाबत माहिती
- क्षेत्रफळ: 252 चौरस फूट
- विक्री किंमत: 1.35 कोटी रुपये
- खरेदी किंमत (2017 मध्ये): 67.90 लाख रुपये
- नफ्यात वाढ: 99%
- या व्यवहारात 6.75 लाख रुपयांची मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्यात आली.
नक्की वाचा - Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर फॅन्सनं 72 कोटींची संपत्ती केली? अखेर सत्य झालं उघड
अक्षय कुमारने आपल्या दोन्ही प्रॉपर्टी जवळपास 7.10 कोटी रुपयांना विकल्या आहेत.बोरिवली ईस्ट हा मुंबईतील एक पॉश परिसर आहे. जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मेट्रो लाईन 7 आणि उपनगरीय रेल्वेने चांगल्या प्रकारे जोडलेला आहे. हा परिसर संजय गांधी नॅशनल पार्कच्या जवळ आहे. गोरेगाव, मलाड सारख्या व्यावसायिक केंद्रांपासूनही (बिझनेस हब) जवळ आहे. स्काय सिटीमध्ये 3BHK, स्टुडिओ आणि डुप्लेक्स अपार्टमेंट्स आहेत. स्क्वायर यार्ड्सनुसार, ऑगस्ट 2024 ते जुलै 2025 पर्यंत या प्रोजेक्टमध्ये 100 व्यवहारांतून 428 कोटी रुपयांची विक्री झाली. अक्षय कुमार व्यतिरिक्त, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनीही मे 2024 पासून या प्रोजेक्टमध्ये अनेक प्रॉपर्टीज खरेदी केल्या आहेत.