
Madanpatti rangaraj: दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता, शेफ आणि उद्योजक माधमपट्टी रंगराज सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्यांनी नुकतेच सेलिब्रिटी स्टायलिस्ट जॉय क्रिजिल्दा यांच्याशी लग्न केले आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे, लग्न झाल्यानंतर काही तासांतच या जोडप्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. माधमपट्टी यांनी आपली पत्नी गर्भवती असल्याचं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. असे सांगितले जात आहे की त्यांची पत्नी लग्नापूर्वीच 6 महिन्यांची गर्भवती आहे.
ट्विटर (X) वर प्रसिद्ध अभिनेता आणि शेफ माधमपट्टी रंगराज यांनी रविवारी फोटो शेअर करत लिहिले, "मिस्टर अँड मिसेस रंगराज". यानंतर काही तासांनी त्यांच्या पत्नी जॉयने एक फोटो पोस्ट करत लिहिले, "बेबी लोडिंग 2025,मी गर्भवती आहे, आणि गर्भधारणेचा 6 वा महिना सुरू आहे." या फोटोंमध्ये रंगराजच्या पत्नी जॉयचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या पोस्टवर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय दोघांनाही ट्रोल केलं जात आहे. निदान घटस्फोटाची तरी वाट पाहिली असती." अशा कमेंट्स त्यावर येत आहेत.
माधमपट्टी रंगराज हा साऊथचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांनी मेहंदी सर्कस या चित्रपटा व्यतिरिक्त कूकू विथ कोमाली या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ते एक प्रसिद्ध शेफ देखील आहेत. बंगळूरुमध्ये त्यांची अनेक रेस्टॉरंट्स आहेत. ते मोठ्या लग्नसमारंभांसाठी केटरिंगचे ऑर्डर्स देखील घेतात. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी 400 हून अधिक लग्नांमध्ये केटरिंग सेवा दिली आहे. ते अनेक कुकिंग शोमध्ये जज म्हणूनही दिसले आहेत. सध्या ते त्यांच्या नव्या लग्नासाठी चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची आणि त्यानंतर त्यांनी पोस्ट केलेल्या प्रेग्नंसीच्या बातमीचीच चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world