Akshay Kumar sold two apartments in Mumbai : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणून ओळखला जातो. मात्र रियल इस्टेटमध्येही अक्षय कुमार खरा 'खिलाडी' ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमार सातत्याने मालमत्ता विकून यापासून चांगली कमाई करताना दिसत आहे. आता अक्षय कुमारने मुंबईतील बोरीवली भागातील ऑबेरॉय स्काय सिटीमधील त्याचे दोन अपार्टमेंटची विक्री केली आहे. CRE Matrix कडून मिळालेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रानुसार, अक्षय कुमारने ही संपत्ती तब्बल ७.१ कोटींना विकली आहे.
बोरीवलीतील अपार्टमेंट्सची कितीला विक्री?
मिळालेल्या माहितीनुसार, वरच्या मजल्यावरील मोठ्या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १,१०१ चौरस मीटर आहे. हे अपार्टमेंट तब्बल ५.७५ कोटींना विकण्यात आलं आहे. कागदपत्रांनुसार, या डीलवर २८.७५ लाखांची स्टॅम्प ड्यूटी लागली आणि यामध्ये दोन पार्किंगसाठीच्या जागेचाही समावेश आहे. त्याच मजल्यावर दुसऱ्या युनिटचा आकार २५२ चौरस फूट इतका आहे. हा फ्लॅट १.३५ कोटींना विकण्यात आला. कागदपत्रांनुनासर, खरेदी करणाऱ्या व्यक्तीने यासाठी ६.७५ लाखांची स्टॅम्प ड्यूटी दिली आणि या डीलमध्ये एक कार पार्किंगच्या जागेचाही समावेश आहे. दोन्ही प्रॉपर्टी सुवर्णा रुपेशकुमार सकपाळ यांनी खरेदी केली आहे. ज्यांचे व्यवहार २ जून २०२६ रोजी नोंदणीकृत झाले. अक्षय कुमारने हे दोन्ही अपार्टमेंट सर्वात आधी नोव्हेंबर २०१७ मध्ये इनक्लाइन रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून खरेदी केले होते. कागदपत्रांनुसार, त्यांनी पहिला फ्लॅट ३ कोटी आणि दुसरा ६७.५५ लाखात खरेदी केला होता.
रियल इस्टेटमधून अक्षयची कमाई...
गेल्या वर्षी अक्षय कुमारने मुंबईतील बोरीवली पूर्वेकडील एका इमारतीतील दोन रेजिडेंशियल अपार्टमेंट ७.१० कोटींना विकले होते. अक्षयने हे दोन्ही अपार्टमेंट २०१७ मध्ये ३.६९ कोटींना खरेदी केले होते. त्यानुसार, ८ वर्षात त्यांना ९२ टक्के परतावा मिळाला आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, अक्षय कुमारने पहिली प्रॉपर्टी ५.७५ कोटींना विकली होती. या डीलमध्ये ३४.५० लाखांची स्टॅम्प ड्यूटी आणि ३० हजारांचा रजिस्ट्रेशन शुल्काचा समावेश होता. दुसऱ्या करारात २५२ वर्ग फुटाचा एक स्टुडियो अपार्टमेंटचा समावेश होता. हा फ्लॅट १.३५ कोटींना विकण्यात आला. दुसऱ्या करारात ६.७६ लाखांची स्टॅम्प ड्यूटी आणि ३० हजारांचं रजिस्ट्रेशन शुल्क लावण्यात आलं.