जाहिरात

Marathi Actress : कधी कधी पाणीपुरी, सॅन्डविज; मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने 70 किलो वजन केलं कमी, चाहते थक्क!

मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने याच चिकाटीने तब्बल ७० किलो वजन कमी केल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्री स्वत: याबाबत माहिती दिली.

Marathi Actress : कधी कधी पाणीपुरी, सॅन्डविज; मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने 70 किलो वजन केलं कमी, चाहते थक्क!
AI Image - प्रतिकात्मक फोटो

Actress Aarti Solanki Weight Loss : वजन कमी करणं हा मोठा टास्क असतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सातत्य. आहार, विहार, चांगली झोप यासह जर सातत्य असेल तर काहीही अशक्य नाही. मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने याच चिकाटीने तब्बल ७० किलो वजन कमी केल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्री स्वत:ला एका पॉडकास्टदरम्यान याबाबत माहिती दिली. 

विनोदी मालिका-नाटक आणि चित्रपटांमधून दिसणारी आरती सोलंकी हिने तब्बल ७० किलो वजन कमी केलं आहे. आरतीने अनेक मराठी-हिंदी चित्रपटात काम केलं आहे. सध्या ती अनेक नाटकांमधूनही दिसत आहे. 'रेगे' चित्रपटातील 'शिट्टी वाजली' या गाण्यात थरकणारी आरती कुणी विसरू शकणार नाही. आरतीचं वजन तब्बल १३२ किलो होतं. मात्र काही महत्त्वाचे बदल करीत तिने चक्क ७० किलो वजन कमी केलं आहे. चाहत्यांना हा सुखद धक्का आहे, अनेकांकडून तिचं कौतुकही केलं जात आहे.

Latest and Breaking News on NDTV

५ वर्षात ७० किलो वजन कसं केलं कमी?

आरतीने एका पॉडकास्टदरम्यान सांगितलं की, गेल्या पाच वर्षांपासून ती प्रचंड मेहनत घेत आहे. या पाच वर्षात तिने तब्बल ७० किलो वजन कमी केलं. यासाठी गेल्या पाच वर्षांपासून ती नियमित चालण्याचा व्यायाम करते. याशिवाय सायंकाळी ६ नंतर काहीही खात नाही. त्यातही भूक लागली तर केव्हातरी पाणी पुरी किंवा सँडविज आहार घेते. तेदेखील शक्यतो टाळते. याशिवाय आरती रात्री ९ वाजता झोपते. मला काहीतरी वेगळं करून दाखवयाचं असल्याचं आरतीने या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.

Latest and Breaking News on NDTV


बाबांच्या निधनानंतर डोळ्यात पाणीही आलं नाही...

आरती सोलंकी हिची आई मुस्लीम तर वडील गुजराती होते. आरतीच्या वडिलांचं हे दुसरं लग्न होतं. वडिलांच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हतं. आरती साडे तीन वर्षांची असताना तिचे बाबा घर सोडून निघून गेले, त्यानंतर ते कधीच परतले नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा आरतीला वडिलांच्या निधनाचा फोन आला तर तिला बाबा कोण हेच आठवेना. बाबांशी कोणत्याच भावना जोडलेल्या नसल्याने अजिबात रडू आलं नसल्याचं आरतीने या पॉडकास्टमध्ये सांगितलं.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com