Dhurandhar FA9LA song: "अक्षय शुटिंगदरम्यान छोटा सिलेंडर घेऊनच फिरत होता"; कोरिओग्राफरने सांगितला किस्सा

Dhurandhar Viral Song: अक्षयचे एन्ट्री सॉन्ग असलेले 'FA9LA, बहरीनच्या हिप-हॉप स्टार फ्लिपराची याने बनवले आहे, तर या गाण्याची कोरिओग्राफी विजय गांगुलीने केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
FA9LA song Akshaye Khanna

 Dhurandhar Viral Song FA9LA: 'धुरंधर' या चित्रपटात रहमान डकैतच्या भूमिकेतील अक्षय खन्नाच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 5 डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, विशेषतः 'FA9LA' या गाण्यातील त्याचे डान्स मूव्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

चित्रपटामध्ये अक्षय खन्नासोबत रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि आर. माधवन यांसारखे मोठे कलाकार आहेत. अक्षयचे एन्ट्री सॉन्ग असलेले 'FA9LA, बहरीनच्या हिप-हॉप स्टार फ्लिपराची याने बनवले आहे. तर या गाण्याची कोरिओग्राफी विजय गांगुलीने केली आहे. या गाण्याच्या शुटिंगदरम्यान अक्षयला सिलेंडर घेऊन फिरावं लागलं.

ऑक्सिजन लेव्हल कमी झाला

विजय गांगुलीने सांगितलं की, अक्षय खन्नाला सीनमध्ये नेमके काय करायचे आहे, हे अचूकपणे माहीत असते आणि तो सीनसोबत खेळतो. लडाखमध्ये शूटिंगदरम्यान त्याला आलेले एक मोठे आव्हान देखील कोरिओग्राफरने शेअर केले.

एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत विजय गांगुलीने या गाण्याच्या शूटिंगचे काही किस्से शेअर केले, लडाखमधील अतिउंच ठिकाणी शूटिंग करताना अक्षय खन्ना त्याच्यासोबत एक लहान ऑक्सिजन सिलेंडर ठेवत असे. आम्ही हे गाणे शूट करत असताना त्याचा ऑक्सिजन लेव्हल कमी झाला होता. प्रत्येक शॉट झाल्यानंतर अक्षय ऑक्सिजन मास्क लावत असे. त्याने अडचणींवर मात करत हा संपूर्ण डान्स सिक्वेन्स पूर्ण केला.

Advertisement

(नक्की वाचा- Dharmendra : देओल कुटुंबानंतर आता हेमा मालिनीने आयोजित केली प्रेयर मीट; ठिकाण, वेळेसंबंधित माहिती जाणून घ्या)

अक्षयचा सहज अभिनय

विजय गांगुलीने मिड-डेला सांगितले, हे गाणे अक्षयच्या पात्राला 'शेर-ए-बलूच'चा मुकुट घातल्याचा उत्सव आहे. मूळतः त्याला डान्सर्समधून लत यायचे होते आणि सिंहासनावर बसायचे होते. सीनचा मूड आणि डान्सर्सचा परफॉर्मन्स पाहून अक्षयने म्हटले की, जेव्हा तो आत येईल, तेव्हा थोडा डान्स करेल.

विजय गांगुलीने सांगितले की, तो काय करणार आहे, हे आमच्यापैकी कोणालाही माहित नव्हते. अक्षय सीनमध्ये आला, त्याने आपोआप परफॉर्म केले. त्या दिवशी आम्ही घेतलेला पहिला शॉट परफेक्ट होता. नंतर आम्ही एक क्लोज-अप घेतला आणि आमचे काम पूर्ण झाले.

Advertisement