Dharmendra's prayer meet organized by Hema Malini : हेमा मालिनी पती धर्मेंद्र यांच्या आठवणीत एक प्रेयर मीटचं आयोजन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी, इशा देओल, अहाना देओल, भरत तख्तानी, वैभव वोहरा यांनी ही प्रेयर मीट आयोजित केली आहे.
धर्मेंद्र यांची पहिली प्रेयर मीट २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज लँड्समध्ये झाली होती. देओल कुटुंबाने या प्रेयर मीटचं आयोजन केलं होतं. यामध्ये चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. प्रवेशद्वाराजवळ धर्मेंद्र यांचे सुपूत्र सनी, बॉबी देओल कुटुंबाच्या इतर सदस्यांसह हात जोडून उभे होते. धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेल्या मित्रमैत्रिणींचे धन्यवाद करीत होते.
या श्रद्धांजली सभेत सोनू नियम यांचा एक म्युजिकल कार्यक्रमही झाला होता. ज्यामध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या आवडीची गाणी गायली. यामध्ये 'आ जा जाने वाले', 'रहें ना रहें हम', 'आज मौसम बड़ा बेईमान है', आणि 'अपने तो अपने होते हैं' याचा समावेश आहे. या प्रेयर मीटमध्ये सामील सेलिब्रिटींमध्ये सलमान खान, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, विद्या बालन, आर्यन खान, विवेक ऑबेरॉय, सुरेश ऑबेरॉय आणि अनेक कलाकार सामील झाले होते.
एकीकडे अनेक जण ताज लँड्समधील प्रेयर मीटमध्ये सामील झाले होते, तर दुसरीकडे काही जण हेमा मालिनीच्या मुंबई स्थित घरी जाऊन शोक व्यक्त करीत होते. महिमा चौधरी, फरदीन खान आणि सुनीता आहुजा, मुलगा यशवर्धनसह हेमी मालिनीला वैयक्तिकपणे भेटायला गेले होते. दिल्लीत आयोजिक केलेल्या प्रेयर मीटपूर्वी हेमा मालिनीने धर्मेंद्र यांच्या आठवणीत आपल्या घरात गीतेचा पाठ केला. यादरम्यान सनी देओल, बॉबी देओल यांनी ८ डिसेंबरला घरात चाहत्यांसह धर्मेंद्र यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला.
कुठे असेल प्रेयर मीट...
११ डिसेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ येथे प्रेयर मीटचं आयोजन करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world