Alka Yagnik News: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञनिक यांना 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबाबत अलका यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "गेल्या दोन वर्षांपासून मी प्रसिद्धीपासून, सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि माझ्या प्रवासाविषयी फार काही सांगण्यापासून दूर राहिले. तुमच्यापैकी अनेकांना हे माहीत होते की मी आरोग्याच्या एका कठीण परिस्थितीतून जात आहे आणि या संपूर्ण काळात तुमचे प्रेम, प्रार्थना, मेसेज आणि खंबीर पाठिंबा प्रत्येक पावलावर माझ्यासोबत राहिला."
व्हायरल इन्फेक्शनमुळे ऐकू येणे झाले कमी
सुमारे दोन वर्षांपूर्वी 60 वर्षीय गायिका अलका याज्ञनिक यांनी सांगितले होते की त्यांना एक दुर्मीळ आजार झाला आहे, ज्याचे नाव 'सेन्सरी न्युरल हिअरिंग लॉस' ( Sensorineural Hearing Loss Symptoms) असे आहे. त्यांनी सांगितले की, एकदा फ्लाइटमधून उतरत असतानाच अचानक त्यांना ऐकू येणे बंद झाले. अलका यांनी सांगितले, "हे सर्व इतकं अचानक घडले की काय झाले हे मला समजलेच नाही. डॉक्टरांनी सांगितले की हा आजार व्हायरल इन्फेक्शनमुळे झाला आहे आणि तो खूप कमी लोकांना होतो. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी प्रार्थना करा." यासोबतच त्यांनी लोकांना इशारा दिला की, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे आणि जास्त वेळ हेडफोनचा वापर करणे कानांसाठी हानिकारक ठरू शकते.
सेन्सरी न्युरल हिअरिंग लॉस (SNHL) म्हणजे काय?
ही एक ऐकण्याशी संबंधित एक सामान्य पण गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये कानाच्या आतील भागाला किंवा ऐकण्याच्या नसेला (ऑडिटरी नर्व्ह) नुकसान पोहोचते. जेव्हा या पेशी किंवा नसा खराब होतात, तेव्हा त्या सहसा आपोआप बऱ्या होत नाहीत. ही समस्या एका किंवा दोन्ही कानांमध्ये होऊ शकते आणि ती हळूहळू किंवा अचानकही सुरू होऊ शकते.
(नक्की वाचा: भाड्याची खोली ते स्वतःचं आलिशान घर! बिग बॉस फेम अनुश्री मानेची स्वप्नपूर्ती, वास्तुशांतीचा Photo Viral)
सुरुवातीची लक्षणे कोणती?
- बोलणे समजण्यात अडचण येणे
- लोकांना वारंवार बोलण्यास सांगणे
- टीव्ही किंवा फोनचा आवाज वाढवावा लागणे
- मोठ्या आवाजाचा त्रास होणे
- लोक स्पष्ट बोलत नाहीत असे वाटणे
- कानात शिटी वाजल्यासारखा किंवा गुणगुणल्यासारखा आवाज येणे
- जास्त वेळ ऐकल्यानंतर थकवा जाणवणे
SNHL चे किती प्रकार आहेत?
- Congenital SNHL: जन्मापासूनच हा आजार असणे
- Acquired SNHL: वय, संसर्ग (इन्फेक्शन) किंवा दुखापतीमुळे होणारी समस्या
- Sudden SNHL: काही तास किंवा दिवसांत ऐकू येणे बंद होणे
- Age-related SNHL: म्हातारपणामुळे कमी ऐकू येणे
- Noise-induced SNHL: मोठ्या आवाजामुळे किंवा म्युझिकमुळे होणारी समस्या
कोणत्या लोकांना जास्त धोका असतो?
- वयोवृद्ध
- मोठ्या आवाजात काम करणारे किंवा गाणी ऐकणारे लोक
- ज्यांच्या कुटुंबात आधीपासूनच कानाशी संबंधित समस्या आहे
- कानाचा संसर्ग किंवा व्हायरल आजार झालेले
- डोक्याला दुखापत झालेले
- मधुमेह (डायबिटीज), उच्च रक्तदाब (High BP) यासारखे आजार असणारे
- काही विशिष्ट औषधे घेणारे (जसे की अँटीबायोटिक्स, केमोथेरपी)
- धूम्रपान करणारे आणि हृदयाचे आरोग्य खराब असणारे
उपचार आणि बचाव कसा करावा?
- हिअरिंग एड (Hearing Aid): ऐकण्याची मशीन लावणे
- Cochlear Implant: अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये ऑपरेशन करणे
- औषधे: अचानक ऐकू येणे बंद झाल्यास त्वरित औषधोपचार घेणे
- स्पीच थेरपी: बोलण्याचा आणि समजून घेण्याचा सराव करणे
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)