Anushri Mane News: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय कंटेंट क्रीएटर अनुश्री मानेचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोशल मीडियावर आपल्या अनोख्या आणि हटके व्हिडीओने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अनुश्रीने स्वतःचे हक्काचे घर खरेदी केले आहे. या नवीन घराचा वास्तुशांती सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या खास क्षणाचे फोटो आणि एक अतिशय भावुक पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे, सध्या तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. भाड्याच्या एका छोट्याशा खोलीपासून सुरू झालेला आपला संघर्षमय प्रवास आज स्वतःच्या हक्काच्या घरापर्यंत कसा पोहोचला, याबद्दल तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"हे घर विटा-सिमेंटचं नाही, तर आईचा त्याग आणि..."
नवीन घराच्या वास्तुशांती सोहळ्याच्या फोटोसह अनुश्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "भाड्याच्या एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. कितीतरी अश्रू, कितीतरी अपयश, कितीतरी जागलेल्या रात्री… पण स्वप्नांवरचा विश्वास कधी सोडला नाही. आज माझ्या स्वतःच्या घराची वास्तुशांती करताना हवनाच्या त्या ज्वाळांमध्ये मला माझा संपूर्ण प्रवास दिसतोय. हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नाही… हे माझ्या आईच्या त्यागाचं, माझ्या कष्टाचं, आणि बाबांच्या आशीर्वादाचं स्वप्न आहे. आज मन भरून आलंय… कारण एकेकाळी डोक्यावर स्वतःचं छप्पर असावं असं स्वप्न पाहणारी मुलगी, आज तिच्या स्वतःच्या घरात देवाचं स्वागत करतेय.
(नक्की वाचा: भर स्टेजवर प्रसूतीकळा,तरीही लावणी थांबवली नाही; श्रद्धा कपूरच्या नव्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL)
वडिलांच्या आठवणीत भावुक
या आनंदाच्या क्षणी अनुश्रीला तिच्या दिवंगत वडिलांची आठवण आली. आपल्या पोस्टच्या शेवटी वडिलांचा उल्लेख करत तिने लिहिले, “बाबा, तुम्ही आज असता तर सर्वात जास्त आनंद तुम्हालाच झाला असता…”
चाहते आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव
अनुश्री माने हिने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिचे रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडतात. त्यानंतर 'बिग बॉस मराठी सीजन 6' मुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली.
(नक्की वाचा: कठीण समय येता 'शाहरुख खान' कामास येतो! Deool Band 2 समोर होती मोठी अडचण, प्रवीण तरडेंना 'लाख'मोलाची केली मदत)
शून्यातून विश्व निर्माण करत, प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अनुश्रीने वयाच्या या टप्प्यावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिच्या या यशाबद्दल सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'बिग बॉस'मधील तिचे सहस्पर्धक, इतर मराठी कलाकार आणि लाखो चाहत्यांनी कमेंट्स करत तिला नवीन घरासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world