शाहरुख खानच्या त्या गोष्टीमुळे अल्लु अर्जुनची जेलमधून सुटका, जाणून घ्या INSIDE STORY

Allu Arjun : अल्लु अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाच्या प्रीमिअर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेत्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Allu Arjun :  पुष्पा 2 सिनेमाच्या प्रीमिअर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अभिनेता अल्लु अर्जुनला शुक्रवारी (13 डिसेंबर) अटक करण्यात आले होते. कारागृहामध्ये एक रात्र काढल्यानंतर शनिवारी (14 डिसेंबर) सकाळी अल्लु अर्जुनची सुटका करण्यात आली. जामीन मंजूर होण्यापूर्वी अल्लु अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयास अभिनेत्याने हायकोर्टामध्ये आव्हान दिले. सुनावणीदरम्यान तेलंगणा हायकोर्टाने अल्लु अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला. पण जेलमधील अधिकाऱ्यांना जामीनाची प्रत रात्री उशीरापर्यंत प्राप्त न झाल्याने अल्लुला तुरुंगात रात्र काढावी लागली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शाहरुख खानचा युक्तिवाद आला कामी 

अल्लु अर्जुनला जामीन मिळावा, यासाठी त्याच्या वकिलाने हायकोर्टात अनेक युक्तिवाद मांडले. यापैकी एक युक्तिवाद बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानशी संबंधित होता. 2017मध्ये शाहरुखच्या 'रईस' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गुजरात राज्यामध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणीही शाहरुखला आरोपी ठरवण्यात आले होते. अल्लु अर्जुनच्या वकिलाने या प्रकरणाचा संदर्भ देत कोर्टाला सांगितले की, गुजरात हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने शाहरुख खानची निर्दोष मुक्तता केली. शाहरुख खानला संबंधित घटनेकरिता जबाबदार मानले गेले नाही.

(नक्की वाचा: अल्लू अर्जुन अटक प्रकरणात वेगळाच ट्विस्ट, मृत महिलेचा पती म्हणाला...)

अल्लु अर्जुनला का करण्यात आली अटक? 

  • संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरला पुष्पा 2 सिनेमाच्या प्रीमिअर शोचे आयोजन करण्यात आले होते.
  • अभिनेता अल्लु अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी येथे चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. 
  • यादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली. 
  • चेंगराचेंगरीमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा 8 वर्षांचा मुलगा जखमी झाला होता.
  • हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी (13 डिसेंबर) अल्लु अर्जुनला अटक केली.  
  • कडेकोट बंदोबस्तात त्याची रवानगी चंचलगुडा कारगृहात करण्यात आली. 
  • यानंतर तेलंगाणा हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आणि शनिवारी (14 डिसेंबर) सकाळी तो जेलमधून बाहेर आला. 

(नक्की वाचा: Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर राजकारण तापलं, वरुण-चिरंजीवी 'पुष्पा' साठी धावले)
 

अभिनेता थिएटरमध्ये येणार होता हे पोलिसांना माहिती होते - अल्लु अर्जुनचे वकील

अर्जुनच्या वकिलाने कोर्टासमोर युक्तिवाद केला की, थिएटर व्यवस्थापनाने पोलिसांना आधीच अभिनेता अल्लु अर्जुनच्या कार्यक्रमाची माहिती दिली होती. सुरक्षेची मागणीही करण्यात आली. अभिनेता थिएटरमध्ये येणार असल्याचे पोलिसांना माहिती होते. ज्येष्ठ वकील एस निरंजन रेड्डी यांनी अभिनेत्याची बाजू मांडताना म्हटले की,"जाणीवपूर्वक आणि निष्काळजीपणामुळे चूक होत नाही, तोवर एखाद्या लोकप्रिय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही".

या प्रकरणात अभिनेत्याविरोधात निर्दोष हत्येचा खटला लागू होऊ शकत नाही, असाही युक्तिवाद वकिलांनी मांडला.