तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2 प्रदर्शित झाल्यानंतर वादामध्ये अडकलाय. त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलीय. त्याचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चिरंजीवी घरी दाखल
अल्लू अर्जुनला कोर्टानं दिलासा दिला नाही. पण, दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसह बॉलिवूड हिरो वरुण धवननं देखील अल्लू अर्जुनला बचाव केला आहे. मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले होते.
अभिनेता वरुण धवननंही या अटकेवर नाराजी व्यक्त केलीय. 'ती दुखद घटना होती. मी संवेदना व्यक्त करतो. पण, त्यासाठी फक्त एकाच व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही,' असं वरुणनं म्हंटलंय. वरिष्ठ अभिनेता एन. बालकृष्णन यांनीही अल्लू अर्जुनची अटक अन्यायकारक असल्याचं म्हंटलं आहे.
( नक्की वाचा : Allu Arjun Story फ्लॉवर नाही फायर ! लाजरा मुलगा कसा बनला सर्वात मोठा 'स्टायलिश स्टार' )
राजकारण तापलं
अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर राजकारणही तापलंय. तेलंगणातील विरोधी पक्ष भाजपा आणि बीआरएसनं तेलुगु सुपरस्टारच्या अटकेनंतर सत्तारुढ काँग्रेसवर टीका केलीय. त्यांनी पुष्पा स्टारला दिलेल्या वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
अभिनेत्याला चांगली वागणूक मिळायला हवी होती, असं मत भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी व्यक्त केलंय. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनीही अल्लूला सामान्य कैद्यासारखी वागणूक दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय.
केंद्रीय गृहराज्यमंत्री संजय कुमार यांनी सांगितलं की, 'भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर ओळख देणाऱ्या कलाकाराला चांगली वागणूक द्यायला हवी होती. संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा झालेला मृत्यू हा दुखद आहे. पण, ही घटना काँग्रेस सरकारला गर्दीचं नियंत्रण करण्यात आलेलं अपयश ठळकपणे दाखवते. या प्रकारच्या हाय प्रोफाईल कार्यक्रमात योग्य व्यवस्था पुरवण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
रामाराव यांनीही या प्रकरणात सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. 'मी या चेंगराचेंगरीतील पीडितांबाबत संवेदना व्यक्त करतो. पण, प्रत्यक्षात कोण अयशस्वी झालं? अल्लू अर्जुन गारुला एका सामान्य अपराध्यासारखं पाहणं चूक आहे. मुख्य म्हणजे या घटनेला तो प्रत्यक्ष जबाबदार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world