KBC 17: सात कोटींच्या प्रश्नाने भल्याभल्यांच्या डोक्याला मुंग्या आल्या, स्पर्धक 1 कोटी घेऊन बाहेर पडला

प्रोमोमध्ये आदित्य कुमार 1 कोटी रुपये जिंकताना दिसतोय. आदित्यने आपल्या ज्ञानाच्या जोरावर हा टप्पा गाठला असून, आता तो 7 कोटी रुपयांसाठी खेळणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
KBC 17

Kaun Banega Crorepati 17 : अमिताभ बच्चन सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' घेऊन परतले आहेत. कौन बनेगा करोडपतीचा 17 वी सीजन 11 ऑगस्ट रोजी सुरू झाला आणि या शोला पहिला करोडपतीही मिळाला आहे. आदित्यने आपल्या ज्ञानाच्या जोरावर सात कोटींच्या प्रश्नापर्यंतचा टप्पा गाठला. 

उत्तराखंडचा रहिवासी आदित्य कुमार हा पहिला करोडपती बनला आहे. तो सीआयएसएफमध्ये डेप्युटी कमांडर आहे. तो गुजरातमधील एका थर्मल पॉवर प्लांटमध्ये तैनात आहे. 

मित्रांना फसवलं

आदित्यने अमिताभ बच्चन यांना कॉलेजच्या दिवसांतील एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "कॉलेजमध्ये असताना मी माझ्या मित्रांची गंमत केली होती. मी त्यांना सांगितले होते की माझी ‘केबीसी'साठी निवड झाली आहे. मी तब्बल एक आठवडा त्यांना ‘केबीसी'ची टीम एका आठवड्यात शूटिंगसाठी येणार आहे, असे सांगून त्यांना मूर्ख बनवले. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून एका मित्राने नवीन पॅन्ट शिवली, तर दुसऱ्याने नवीन शर्ट घेतला. एक आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी मला टीम का आली नाही असे विचारले, तेव्हा मी त्यांना सांगितले की मी फक्त मस्करी करत होतो."

यावेळी जेव्हा त्याला खरोखरच ‘केबीसी'कडून फोन आला, तेव्हा त्याच्या मित्रांनी विश्वासच ठेवला नाही. जेव्हा त्याने त्यांना ‘केबीसी'कडून आलेला मेसेज दाखवला, तेव्हाच त्यांचा विश्वास बसला. यावर अमिताभ बच्चन यांनी हसत म्हटले, “आपण केवळ शोमध्ये आला नाही, तर गेममध्ये खूप पुढेही आला आहात.”

Advertisement

7 कोटींचा प्रश्न

प्रश्न- 1930 च्या दशकात कोणत्या जपानी कलाकाराने भारताला भेट दिली आणि ताजमहाल, सांची स्तूप आणि वेरूळ लेण्यांचे चित्रण करणारी एक प्रसिद्ध मालिका तयार केली?

A) हिरोशी सुगीमोतो

B) हिरोशी सेंजू

C) हिरोशी योशिदा

D) हिरोशी नाकाजिमा

Topics mentioned in this article