IIM मधून शिक्षण, Meta मध्ये नोकरी, तरीही कंपनीत थेट VIP प्रवेश नाही; अमिताभ बच्चन यांच्या नातीला थेट इशारा

उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या कुटुंबातील मुलांना सहज मोठी पदं मिळतात, अशा स्थितीत एस्कॉर्ट्स कुबोटा (Escorts Kubota) कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर निखिल नंदा यांनी एक आदर्श उदाहरण समोर ठेवलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या कुटुंबातील मुलांना सहज मोठी पदं मिळतात, अशा स्थितीत एस्कॉर्ट्स कुबोटा (Escorts Kubota) कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर निखिल नंदा यांनी एक आदर्श उदाहरण समोर ठेवलं आहे. ते ३१ हजार कोटी मार्केट कॅप असलेल्या कंपनीचे मालक आणि महानायक अमिताभ बच्चन यांचे जावई आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, ३१ हजार कोटींच्या त्यांच्या कंपनीत केवळ 'नंदा' आडनावामुळे कोणालाही पद मिळणार नाही. मग त्याजागी त्यांची मुलगी नव्या नवेली नंदाही असो. 

नुकत्याच एका मुलाखतीत निखिल नंदा यांनी कंपनीचं भविष्य आणि कुटुंबाच्या भूमिकेवर मोकळेपणाने म्हणणं मांडलं. ते म्हणाले, त्यांचं लक्ष्य पुढील २०० वर्षांपर्यंत कंपनीला मजबूत करणं आहे. त्यांच्यानुसार, ते कंपनीला केवळ वर्तमानासाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठी तयार करीत आहेत. ते पुढे म्हणाले, मला सत्तेत वा चर्चेत राहण्याची इच्छा नाही. कंपनी आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रगती पाहून आनंद मिळतो. 

Advertisement

नक्की वाचा - Payroll System : एकदाच नाही, महिन्यात 2 वेळा पगार; 'या' दिग्गज उद्योगपतीचं कंपन्यांना मोठं आवाहन

Escorts Kubota एक लिस्टेड कंपनी...

कंपनीत कुटुंबातील पुढच्या पिढीच्या भूमिकेवर निखिल नंदा म्हणाले, एस्कॉर्ट्स कुबोटा एक लिस्टेड कंपनी आहे. येथे कॉर्पोरेट गव्हनन्स आणि शेअरधारकांच्या अपेक्षा महत्त्वपूर्ण असतात. अशा परिस्थितीत, नियमांनुसार कौटुंबिक प्रतिनिधित्व सुरू राहील, परंतु केवळ कौटुंबिक ओळखीच्या आधारावर कोणालाही जबाबदारी दिली जाऊ शकत नाही.

IIM अहमदाबादमधून नव्या नवेली नंदाने घेतलं शिक्षण...

नव्या नवेली नंदा हिच्याबद्दल बोलताना निखिल नंदा म्हणाले, त्यांची मुलगी कंपनीच्या कामात इच्छा दाखवत आहे.  मात्र तिचं आडवान तिला कोणत्याही पदाचा अधिकार मिळवून देत नाही. नंदा पुढे म्हणाले, नव्याला स्वत:ची जागा स्वत:च निर्माण करावी लागेल आणि योग्यता सिद्ध करावी लागेल. नव्या यासाठी सक्षम आहे. नव्या स्मार्ट आणि महत्त्वाकांक्षी असल्याचं निखिल नंदा म्हणाले. ते पुढे म्हणाले, नुकतच नव्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून शिक्षण पूर्ण केलं आहे आणि मेटासारख्या मोठ्या कंपनीतही तिने काम केलं आहे.