जाहिरात

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं, लुक अन् संगीताची एकच चर्चा, Video पाहून सर्व जण म्हणत आहेत...

अमृता फडणवीस यांनी हे नवं गाण आपल्या चाहत्यांसाठी आणलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं, लुक अन् संगीताची एकच चर्चा, Video पाहून सर्व जण म्हणत आहेत...
  • अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित नवं गाणं 'नमन तुला' प्रदर्शित केलं
  • या गाण्याला प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले असून टी-सीरीज प्रस्तुत आहे
  • गाण्याच्या ओघवत्या बोलांमध्ये शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि कर्तृत्वाला अभिवादन व्यक्त केलं आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस आता पुन्हा एकदा आपल्या स्वरांनी रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांच्या 'नमन तुला' हे नवे गाणे प्रदर्शित झालं आहे. या गाण्याची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर त्यांच्या नव्या लुकची आणि नव्या गाण्याची चर्चा ही चांगलीच रंगली आहे. अमृता फडणवीस या त्यांच्या गायनामुळे नेहमीच समाजमाध्यमांवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे 'नमन तुला' हे गाणे आणले आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार अनु मलिक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. टी-सीरीजच्या माध्यमातून ही गाणं प्रदर्शित झालं आहे. 

1 मे रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला गेला. याच खास दिवशी अमृता फडणवीस आपले नवीन गाणे प्रेक्षकांसाठी घेऊन आल्या आहेत. 'नमन तुला' असे या गाण्याचे शब्द असून, या गाण्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला आणि कर्तृत्वाला मानवंदना दिली आहे. "जिथे मातीमध्ये ही शौर्य आहे, तिथेच उभा आहे आमचा राजा नमन तुला," असे या गाण्याचे ओघवत्या शैलीतील बोल आहेत. या गाण्यासोबत अमृता फडणवीस यांच्या या गाण्यातील लूकची ही चर्चा होत आहे. सर्वांनी त्यांना त्यांच्या नव्या लुकबद्दल कौतूक केलं आहे. 

नक्की वाचा - Karisma Kapoor :21 वर्षांची झाली करिश्मा कपूरची मुलगी, वडिलांची होती लाडकी लेक, भावाशी खास बॉन्डिंग, Photos

या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. टी-सीरीज (T-Series) प्रस्तुत या गाण्यात कुलकर्णी आणि शक्ती हसीजा यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून या गाण्याचा टीझर शेअर केला असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. गाण्याचे बोल मनाला भिडणारे आहेत. यापूर्वी त्यांच्या 'शंभु रे' आणि 'किसी की मुस्कुराहटो पे' या गाण्यांनी चांगलीच पसंती मिळवली होती, त्यामुळे आता या नव्या गाण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे.

नक्की वाचा - Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, सैराटलाही टाकलं मागे

अमृता फडणवीस यांनी २०२६ या वर्षात आतापर्यंत अनेक गाणी चाहत्यांच्या भेटीला आणली आहेत. जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी 'किसी की मुस्कुराहटो पे' हे गाणे प्रदर्शित केले होते, तर फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्री निमित्त 'शंभु रे' हे भक्तीगीत सादर केले होते. ॲक्सिस बँकेतील उच्चपदस्थ नोकरी सांभाळून गाण्याची आवड जोपासणाऱ्या अमृता फडणवीस आता पूर्ण वेळ संगीत क्षेत्राकडे वळल्याचे दिसून येत आहे. गायक आणि कलाकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी हे नवं गाण आपल्या चाहत्यांसाठी आणलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com