
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा ही दिल्या आहेत. शिवाय मी पुन्हा येईन याची आठवणही या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी विरोधकांना करून दिली आहे. मी पुन्हा येईन वरून देवेंद्रजींना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. पण देवेंद्रजींनी पुन्हा येऊन दाखवलं आहे. आता आम्ही सर्व जण त्यांच्या सोबत आहोत अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत त्याचा आनंद असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या. देवेंद्रजी हे सहाव्यांदा आमदार होत आहेत. तर तीसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्याचा आनंद आहेच. पण त्याच बरोबर देवेंद्र यांची जबाबदारीही वाढली आहे. राज्याची या पुढची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने असेल असंही त्या म्हणाल्या.
देवेंद्र यांच्या जिवनात नेहमीच संघर्ष राहीला आहे. त्याचे आपण साक्षिदार असल्याचंही अमृता म्हणाल्या. त्यांच्या अंगात जिद्द आहे. एखादी गोष्ट करून दाखवायची म्हणजे दाखवायचीच हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्यात प्रचंड पेशन्स आहेत. त्यामुळेच ते या पदापर्यंत पोहोचू शकले असंही त्या म्हणाल्या. त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं आहे याचा आनंद आहे. पण हे सर्व पदासाठी नव्हतं. तर त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र बनवण्यासाठी होतं.
ट्रेंडिंग बातमी - शपथविधी सोहळ्यापूर्वी मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन
राज्यातल्या लाडक्या बहीणी महायुतीच्या मागे खंबिर पणे उभ्या राहील्या. देवेंद्रजींच्या मागे उभ्या राहील्या. देवेंद्रजीनी डोळ्यासमोर टार्गेट ठेवलं होतं. ज्या वेळी त्यांनी मी पुन्हा येईन असं सांगितलं होतं, त्यावेळी त्यांच्या डोळ्या समोर ते धेय होतं. त्यांना विश्वास होता. ते त्यांनी करून दाखवले. ते पुन्हा आले. येवून दाखवलं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यांना दिलेल्या जबाबदारीचं त्यांनी चिज करून दाखवलं आहे.
ते मुख्यमंत्री होतील की नाही याचा कधी विचार केला नव्हता. पण त्यांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ त्यांना पक्षश्रेष्ठींनी निश्चित दिलं आहे असंही त्या म्हणाल्या. ते पदाचा वापर लोकसेवेसाठी करतील. पहिला निर्णय ही लोकहिताचा असेल असंही त्यांनी सांगितलं. भाजप बरोबर धोका झाला होता. आता सर्व ठिक झालं आहे. आताचा मौसम चांगला आहे. सर्व जण देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत असंही अमृता यावेळी म्हणाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world