या लहान मुलीने दिले आहेत 3 हिट सिनेमे, OTT वर ही तिची जादू, वडिल प्रसिद्ध अभिनेते तर भाऊ...

ती 30 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

तुम्ही फोटोत पाहात असलेली लहान मुलगी कोण असा प्रश्न पडला असेल. पण ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्ये तीन चित्रपट सुपरडुपर हिट दिले आहेत. तिचे नाव म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे. ती 30 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. अनन्याच्या आई, भावना पांडे, तिच्या 'बर्थडे वीक'बद्दल खूप उत्साही आहेत. तिने आपल्या मुलीचा एक अतिशय गोड जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही छोटी अनन्या  7 ते 8 वर्षांची असेल, जी एका गेम झोनमधील कारमध्ये बसलेली दिसत आहे. 

हा फोटो शेअर करताना भावनाने कॅप्शनमध्ये लिहिले, "माझी प्यारी येत आहे." अनन्याने लगेचच आईची ही पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'फ्लाइंग किस' इमोजीसह पुन्हा शेअर केली. अनन्या आणि भावना पांडे यांचे नाते खूप घट्ट आणि मैत्रीपूर्ण आहे. दिवाळीलाही अनन्याने आईच्या जुन्या कपड्यांची आठवण शेअर केली होती.

नक्की वाचा - Sachin Pilgaonkar: 'सतिशने जाण्या आधी मला मेसेज केला होता तोपर्यंत..' सचिन पिळगावकरांची पोस्ट चर्चेत

दिवाळीसाठी अनन्याने प्रसिद्ध डिझायनर रोहित बल यांनी डिझाइन केलेला आईचा एक 'पिंक विंटेज' ड्रेस परिधान केला होता. तो आई भावना यांनी 20 वर्षांपूर्वी वापरला होता. अनन्याने याला "माझ्या आईच्या कपाटातील 20 वर्षांहून अधिक जुना 'विंटेज गुड्डा'" असे म्हटले होते. यासोबतच तिने कानातले घातले होते. जे तिच्या आजीने आईला लग्नात दिले होते.एका व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळी कुटुंबातील सदस्य तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करताना दिसले, ज्यामुळे ती घरातील 'लक्ष्मी' असल्याचा संकेत मिळाला.

नक्की वाचा - Big Boss 19 Video: अशनूर कौरच्या अंडरआर्ममध्ये केस, अभिषेक बजाजने सर्वांसमोर उडवली खिल्ली! नेटकरी संतापले..

अनन्याने आता पर्यंत काही चित्रपट हिट दिले आहेत. तीने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून पदार्पण केले. तिची शेवटची ओटीटी सिरीज 'कॉल मी बे' खूप गाजली. याशिवाय, 'ड्रीम गर्ल 2', 'लाइगर' आणि 'पती पत्नी और वो' यांसारख्या हिट चित्रपटांमध्येही ती दिसली आहे. पुढे ती 'तू मेरी मैं तेरा' आणि 'चांद मेरा दिल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Advertisement