 
                                            Big Boss 19 Ashnoor Kaurt Viral Video : बिग बॉस 19 मध्ये अशनूर कौरच्या बॉडी शेमिंगबाबत तान्या मित्तर, नीलम गिरी आणि कुनिका सदानंदला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशातच एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये अभिषेक बजाज अशनूरला तिच्या बॉडी हेअर्सची खिल्ली उडवताना दिसतात. दोघांमध्ये छोटे-मोठे मजेशीर किस्से घडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पण त्यानंतर अशनूरने हेअर व्हॅक्सिंग करत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने ट्रोल करायला सुरुवात केलीय. काही नेटकऱ्यांनी अभिषेकवरही टीकेची झोड उठवली आहे.
बॉडी हेअरबाबत उडवली खिल्ली
या व्हिडीओत पाहू शकता की, अभिषेक आणि अशनूर एकत्र बसले आहेत. अभिषेक तिच्या कपड्यांकडे इशारा करत काहीतरी विचारतो. यावर अशनूर म्हणते, आता थंडी जाणवत आहे. यावर अभिषेत अशनूरची खिल्ली उडवत म्हणतो, काहीतरी लपवतत आहेत का? असं काहीतरी वाटतंय..स्पायकी?, अभिषेक पुन्हा म्हणतो, स्पायकी वाटतंय..त्यानंतर तो म्हणतो मलाही ट्रिक कर..यावर अशनूर स्पष्ट म्हणते, मला तर मिशीच नाहीय. अभिषेक मजेशीर कमेंट करत म्हणतो..जर असती तर अशनूरसारखीच असती. त्यानंतर अशनूर केस स्वच्छ करत असल्याचं व्हिडीओत दिसतं.
नक्की वाचा >> भारतीय ट्रेनमध्ये चढली परदेशी महिला, गर्दीत आला सर्वात घाणेरडा अनुभव, थेट मोबाईल काढला अन् व्हिडीओ Viral केला
व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
https://t.co/pAqGYtSpsH
— SatyavadiLadki (@SatyavadiLadki) October 28, 2025
Oh gowd kia kia bolta hai ye banda wakai me bailbudhi hai,
Etna bada hai age me manners nam ka ek chiz nahi hai ashnoor bachi hai aise national television pe kehna ye kai masoom bachio ko hurt kar sakta hai jo show dekhti hai,
Ash 21 ki hai usko Etna…
या व्हिडीओमुळे आता ट्रोलिंग सुरु झाली आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, अभिषेकने बॉडी शेमिंग केली. पण त्याला ट्रोल का केलं जात नाही?, तर काहींचं म्हणणं आहे की, हे तर दोन मित्रांमध्ये झालेली मजेशीर गोष्ट आहे. अन्य एका यूजरने म्हटलंय, हे दोघेही पहिल्या दिवसापासूनच अशच वागतात. दुसऱ्या यूजरने म्हटलं, मैत्रित हे सर्व नॉर्मल आहे. इथे तान्यासारखे निगेटिव्ह माणसं नाहीयत. तिसऱ्या यूजरने म्हटलं, आता काही बोलण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. अभिषेकला स्वत:ला थोडीशी लाज नाही वाटली का?, असं म्हणत एका नेटकऱ्याने अभिषेकला झापलं.
नक्की वाचा >> Instagram Video: ट्यूशनला न पाठवताच मुलांना कसं शिकवाल? या 5 गोष्टी रोजच करा, क्लासमध्ये मुलं नेहमीच करतील टॉप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
