Ankita Walawalkar: "अति शहाणपण नको!" 'धुरंधर' ट्रेंडवर टीका करणं 'कोकण हार्टेड गर्ल'च्या अंगलट; कमेंट्स वाचा

अंकिताची ही पोस्ट पाहताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आणि तिला तिची जुनी उणीदुणी काढून दाखवली. अनेकांनी ही पोस्ट म्हणजे केवळ एक*'पब्लिसिटी स्टंट' असल्याचे म्हटले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Ankita Walawalkar Post : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि 'बिग बॉस मराठी 5' ची स्पर्धक अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) म्हणजेच 'कोकण हार्टेड गर्ल' नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मात्र, यावेळी ती तिच्या एखाद्या मालवणी रीलमुळे नाही, तर चक्क एका व्हायरल ट्रेंडवर टीका केल्यामुळे चर्चेत आली आहे. 'धुरंधर' (Dhurandhar) सिनेमातील रणवीर सिंहच्या स्पाय पात्रावर आधारित '1st Day as Spy in Pakistan' हा ट्रेंड सध्या जोरात आहे. पण अंकिताने याला विरोध दर्शवल्याने नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत.

काय आहे 'धुरंधर' ट्रेंड आणि अंकिताचा आक्षेप?

सध्या सोशल मीडियावर 'धुरंधर' सिनेमाची मोठी हवा आहे. अभिनेता रणवीर सिंह यामध्ये एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. यावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स आणि विनोदी व्हिडीओ तयार होत आहेत. "पाकिस्तानमध्ये गुप्तहेराचा पहिला दिवस" असं म्हणत लोक मजेशीर रील्स बनवत आहेत.

नक्की वाचा >> 'धुरंधर' कार लव्हर्ससाठी व्हिज्युअल ट्रीट; सिनेमात अक्षय, रणवीरच नाही तर 'या' गाड्यांनीही भाव खाल्लाय!

अंकिताने काय म्हटलं?

अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, "Spy वर मस्करी करून reel बनवणं म्हणजे विनोद नाही तर अज्ञान आहे. त्यांचं आयुष्य कंटेंट नाही, तो दररोजचा धोका आहे. थोड्या views साठी देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हे IQ नाही, हे संवेदनशून्यपणाचं प्रदर्शन आहे. Spy बनायला फक्त attitude नाही तर, मेंदू, धैर्य आणि त्याग लागतो. तुमच्या reels मुळे चित्रपट promote होतील, पण त्यामागे असलेली देशसेवा, देशासाठी जगणाऱ्यांची किंमत कमी होतेय हे लक्षात ठेवा. एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. नाव विसरावं लागतं, कुटुंब विसरावं लागतं, आणि तरीही देश पहिला... Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी..."

Advertisement

नेटकऱ्यांचा संताप आणि 'पब्लिसिटी स्टंट'चा आरोप

अंकिताची ही पोस्ट पाहताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आणि तिला तिची जुनी उणीदुणी काढून दाखवली. अनेकांनी ही पोस्ट म्हणजे केवळ एक*'पब्लिसिटी स्टंट' असल्याचे म्हटले आहे.

काही युजर्सच्या कमेंट्स

- "जेव्हा अंकिता सुरुवातीला पांचट किंवा ह्या reel सारखेच reels बनवायची आणि तिला कुणी सांगितलं की असा अपमान नको करू. तेव्हा हीच लोकांना हा फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे, असं म्हणायची आणि आता इतर कुणी बनवलं तर ही त्यांना शहाणपणा शिकवते आहे? माझा स्वतःचा अनुभव आहे हिच्या एका reel वर मी कमेंट केली तेव्हा हिने मला हे उत्तर दिलं होतं.

Advertisement

- प्रत्येक गोष्टीत ज्ञान द्यावं हे गरजेचं नाही. काही गोष्टी मनोरंजनापुरत्याच बघाव्या. कंटेंट नाही म्हणून मी किती मॅच्युअर आहे हे दाखवायची गरज नाही.

- ह्याच विषयावर पूर्ण मुव्ही बनलेला आहे, मग त्यालाही विरोध कराल का? प्रत्येक movie, reel किंवा video हा reality नसतो. काही content फक्त मनोरंजनासाठी आणि creator ची कला दाखवण्यासाठी असतो.

Advertisement

- खरा spy कधी camera समोर उभा राहून reels बनवत नाही. म्हणून हा spy mission नाही, ही एक creative performance आहे.

- मालवणी भाषा म्हणजे शिव्या नाहीत; त्या भाषेत गोडवा आहे, पण काही लोक मुद्दाम त्या शब्दांवर जास्त जोर देतात आणि तेच viral करतात. एखाद्या गोष्टीला इतकं गंभीरपणे घेण्यापेक्षा थोडं हलकं घेणंही शहाणपणाचं असतं.

- प्रत्येक मनोरंजनात्मक content वर चूक काढत बसलो, तर comedy उरणार नाही. हसून घ्या, कला ओळखा आणि पुढे चला एवढंच.

- ही reel बनवून तू पण घेतला ना trend follow करून आणि ते चेष्टा नाही करत आहेत. ते हे दाखवत आहेत की जर ते गेले तर ते पहिल्याच दिवशी पकडले जातील. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून स्पाय एवढी वर्ष तिथे राहतात म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे असा अर्थ होतो. पण नेहमी लेक्चर देणं हे पण तुमच्या content चा एक भागच आहे.

- काहींना आयुष्यात मोठ्या गोष्टींचा नाही, भांडी घासायचाच ट्रॉमा असतो.

- दुसऱ्यांना बोलून शेवटी स्वतः पण त्याच विषयावर रील बनवली. हेतू काहीही असू दे पण विषय शेवटी तोच घेतला.! सो ट्रेनिंग विषय तुम्ही पण नाहीच सोडला

Topics mentioned in this article