Dhurandhar Movie Car Collection: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर' हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट केवळ धमाकेदार कथा आणि डायलॉग्ससाठीच नव्हे, तर त्याच्या चित्रीकरणामध्ये वापरलेल्या जबरदस्त गाड्यांच्या कलेक्शनमुळेही चर्चेत आहे. सिनेमात स्पाय थ्रिलरमध्ये अॅक्शन सीनसोबत काही अशा गाड्या पाहायला मिळाल्या, ज्यांनी कारप्रेमींचे मन जिंकले.
कोणत्या गाड्यांनी आपली छाप पाडली?
लेक्सस एलएक्स 470 (Lexus LX 470)
पोलीस अधिकारी एसपी अस्लम चौधरी यांची भूमिका साकारणाऱ्या संजय दत्तची सिनेमातील पाठलाग करण्याची स्टाईल दमदार दाखवण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी लेक्सस एलएक्स 470 ही एसयूव्ही निवडली. पांढऱ्या रंगाची ही एसयूव्ही कार संजय दत्तच्या 'रफ-टफ' इमेजला योग्य ठरते.

मेजर इकबालची लँड रोव्हर डिफेंडर
मेजर इकबालची भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन रामपाल देखील यात मागे नाही. त्याची लँड रोव्हर डिफेंडर (Land Rover Defender) एन्ट्री देखील भाव खावून गेली आहे. एका मेजरसाठी यापेक्षा शानदार गाडी दुसरी काय असू शकते, असे म्हणता येईल.

रेहमान डकैतचा टोयोटा लँड क्रूजर 60 सीरिजमधील क्लासिक अंदाज (Toyota Land Cruiser 60 Series)
चित्रपटाचा व्हिलन रेहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाची एंट्री जेवढी जबरदस्त होती, तेवढीच त्याची गाडी देखील खास आहे. चित्रपटात अक्षय खन्ना एक जुनी आणि आयकॉनिक टोयोटा लँड क्रूजर 60 सीरिज वापरताना दिसतात. ही गाडी 1980 ते 1990 दरम्यान तयार करण्यात आली होती आणि तिची ऑफ-रोडिंगची ताकद आजही जगभर प्रसिद्ध आहे.
पोलिसांच्या टाटा जेनॉन (Tata Xenon) आणि इसुझू डी-मॅक्स (Isuzu D-Max)
चित्रपटात केवळ मोठ्या एसयूव्हीच नाही, तर काही पिकअप ट्रक्स देखील पाहायला मिळाल्या. ज्यात टाटा जेनॉन आणि इसुझू डी-मॅक्स यांचा समावेश आहे. टाटा जेनॉन ही गाडी रेहमानच्या पळून जाण्याच्या मार्गाला अडथळा निर्माण करण्यासाठी वापरली गेली. इसुझू डी-मॅक्स ही गाडी तिच्या उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमतेसाठी ओळखली जाते आणि ती रेहमान डकैतच्या ताफ्याचा भाग होती. एकंदरीत 'धुरंधर' हा केवळ एक अॅक्शन थ्रिलर नसून, कार लव्हर्ससाठी एक खास व्हिज्युअल ट्रीट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world