जाहिरात

'तो अर्ध्या मुंबईतील मुलींसोबत रात्र...', Ex बॉयफ्रेंडबाबत अनुषाचा धक्कादायक खुलासा, स्वत:च शेअर केला Video

अनुषाने एक व्हिडिओ आपल्या युट्यूब अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर धक्कादायक आरोप केले आहेत.

'तो अर्ध्या मुंबईतील मुलींसोबत रात्र...', Ex बॉयफ्रेंडबाबत अनुषाचा धक्कादायक खुलासा, स्वत:च शेअर केला Video

Anusha Dandekar talk about EX boyfriend : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटक्षेत्रात लोकप्रिय असलेल्या एका अभिनेत्रीने भूतकाळातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. युट्यूब चॅनलवरुन तिने आपला अनुभव कथन केला आहे. तिच्या या खुलाशानंतर सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे अनुषा दांडेकर. अनुषा दांडेकरने एमटीव्हीमध्ये VJ म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने बराच काळ मॉडेलिंगही केलं. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केलं. (Anusha Dandekar accused her ex-boyfriend)

एक अशी वेळ होती जेव्हा अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा यांची जोडी सर्वात लोकप्रिय आणि आदर्शवत मानली जात होती. त्यामुळेच त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला. ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अनुषाने मौन सोडलं आहे. 

अनुषा दांडेकरचा खुलासा...

अभिनेत्री अनुषा दांडेकरने एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्रा याच्यासोबत पाच वर्षांच्या नातेसंबंधावरुन मोठे खुलासे केले आहेत.  तिने सांगितल की, त्यांच्या नात्यातील दुराव्याचं कारण फसवणूक होती. अनुषाने सांगितलं की, करणने तिची फसवणूक केली आणि तो खोटं बोलला. 

अनेक मुलींसोबत संबंध...

अनुषाने आपल्या युट्यूब चॅनलवर नाव न घेता करणवर निशाणा साधला आहे. तिने सांगितलं की, ते एरा डेटिंग अॅपसाठी कॅम्पेन करीत होते. ज्यामध्ये ते दोघेही होते. मात्र करण त्या डेटिंग अॅपचा वापर दुसऱ्या मुलींसोबत बोलायला आणि त्यांना भेटायला करीत होता. अनुषाने पुढे सांगितलं की, करणने मुंबईतील अनेक मुलींसोबत होता आणि हे सर्व तो लपवत होता. ती पुढे म्हणाले, लोक तिला गोल्ड डिगर म्हणत होते. मात्र प्रत्यक्षात ती करणला काम मिळवून देत होती. करण आपल्या मित्रांना सांगायचा की, तो केवळ कामासाठी तो अनुषासोबत आहे. 

(17.15 मिनिटानंतर अनुषा आपल्या EX प्रियकरासोबतच्या अनुभवाविषयी बोलते )

अनुषा मराठी अभिनेत्याला डेट करतेय?

करण आणि अनुषा 2016 ते 2019 पर्यंत एकत्र होते. 2020 वर्षाच्या शेवटी ते वेगळे झाले. आता करण अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिच्या सोबत आहे. तर अनुषा अद्याप एकटीच आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ती सिंगल असल्याचं सांगितलं जातं. यापूर्वी ती भूषण प्रधानसोबत असल्याची अफवा होती. मात्र दोघांनीही हे नातं पब्लिक केलं नव्हतं.  


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com