अनुषा दांडेकर 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला करतेय डेट? व्हायरल फोटोंमुळे चाहत्यांमधील उत्सुकता वाढली

यापूर्वी अनुषाने पोस्टमध्ये तिच्यासोबत नात्यात फसवणूक झाल्याचा आरोपही केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकर हिचे मालदिवमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये ती एक मराठमोळ्या अभिनेत्यासोबत दिसत आहे. त्यामुळे अनुषा आणि तो  मराठमोळा अभिनेता डेट करीत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

साधारण दोन ते अडीच वर्षांपूर्वी अनुषा दांडेकर हिने करण कुंद्रा यांच्यासोबत पाच वर्षे असलेल्या नात्याच्या विरामाची पोस्ट केली होती. यावेळी अनुषाने पोस्टमध्ये तिच्यासोबत नात्यात फसवणूक झाल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर अनुषा आणि अभिनेता भूषण प्रधान एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा सुरू आहे. 

महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या चित्रपटात अनुषा आणि भूषण दोघांनीही भूमिका साकरली आहे. काही दिवसांपूर्वी अनुषा हिने भूषण प्रधान याच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. तेव्हाही त्यांच्यातील खास नात्याची चाहत्यांकडून चर्चा सुरू होती. आता पुन्हा एकदा अनुषाने काही फोटो शेअर केले आहेत. मालदिवमध्ये दोघेही एकमेकांसोबत चांगले क्षण घालवताना दिसत आहे.  

नक्की वाचा - Hashtag Tadev Lagnam : सुबोध नमिळतोय मुलींकडून नकार, पाहिला का व्हिडीओ?

मात्र अद्याप दोघांपैकी कोणीही आपल्या नात्याचा खुलासा केलेला नाही. मात्र दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना आवडत असल्याचं दिसतंय. अनुषाच्या या पोस्टमध्ये चाहत्यांकडून अशाच प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत. अनेकजण तिला दोघांमधील नात्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. अनेकांनी दोघे एकमेकांसोबत खूप चांगले दिसत असल्याचंही म्हटलं आहे. 

Advertisement