जाहिरात

Hashtag Tadev Lagnam : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार, पाहिला का व्हिडीओ?

Hashtag Tadev Lagnam : 'हॅशटॅग तदेव लग्नम्'मधील 'नकारघंटा' हे गंमतीशीर गाणं रिलीज करण्यात आले आहे. 

Hashtag Tadev Lagnam : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार, पाहिला का व्हिडीओ?
Hashtag Tadev Lagnam सिनेमाचे नकारघंटा गाणे रिलीज

Hashtag Tadev Lagnam Song : सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची फ्रेश जोडी असणारा 'हॅशटॅग तदेव लग्नम्' सिनेमाचे नवेकोरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेले धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'नकारघंटा...' असे गाण्याचे बोल आहेत. हे गाणे अभिनेता सुबोध भावेवर चित्रित करण्यात आले आहे. पंकज पडघन यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. आदर्श शिंदेच्या दमदार आवाजामुळे गाणे चांगलेच रंगले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'हळूच मनाचं दार उघडून, रोज नवी येते आणि जाते वाजवून घंटा...  नकारघंटा...' या ओळींमधूनच प्रेक्षकांना साधारण कल्पना आली असेलच. मुलींच्या अपेक्षांच्या यादीमध्ये न बसल्याने बहुतेक स्थळांकडून सुबोध भावेला नकारच मिळत असल्याचे या गाण्यामध्ये दिसत आहे. सुबोधच्या आयुष्यातील ही नकारघंटा थांबून तो बोहल्यावर चढणार का? हे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 20 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा शुभम फिल्म प्रोडक्शनचा सिनेमा आहे. 

Hashtag Tadev Lagnam Teaser: सुबोध भावे-तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार?'हॅशटॅग तदेव लग्नम'चा टीझर रिलीज

(नक्की वाचा: Hashtag Tadev Lagnam Teaser: सुबोध भावे-तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार?'हॅशटॅग तदेव लग्नम'चा टीझर रिलीज)

Hashtag Tadev Lagnam सिनेमाची तगडी स्टारकास्ट

आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमामध्ये सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर शेखर विठ्ठल मते या चित्रपटाचे निर्माते आहेत. 

Jantar Mantar Choomantar: दिवाळीच्या मुहूर्तावर 'जंतर मंतर छूमंतर' हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा

(नक्की वाचा: Jantar Mantar Choomantar: दिवाळीच्या मुहूर्तावर 'जंतर मंतर छूमंतर' हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा)

नकारघंटा या गाण्याबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले की,"चित्रपटाची कथा पुढे नेणारं हे एक मजेदार गाणं आहे. वय वाढलं की लग्न जमवणं हे एक मोठं आव्हान असतं आणि अशातही एखादी मनासारखी मुलगी मिळालीच तर तिच्या अपेक्षांच्या यादीत बसणं, हे त्याहूनही मोठं आव्हान असतं. मग अशा वेळी पचवावा लागतो, तो नकार... हेच गंमतीशीररित्या या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या गाण्याचे बोल, संगीत आणि आदर्श शिंदे यांचा जबरदस्त आवाज हे सगळंच खूप छान जुळून आलं आहे.''


'हॅशटॅग तदेव लग्नम्' सिनेमा 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com