जाहिरात

हॉट अभिनेत्रीसोबतचा संसार मोडला, मेकअप आर्टिस्टवर प्रेम जडले; हा खान आता पुन्हा बनणार बाप

हॉट अभिनेत्रीसोबतचा संसार मोडला, मेकअप आर्टिस्टवर प्रेम जडले; हा खान आता पुन्हा बनणार बाप
अरबाज खान पुन्हा बाप होणार असून त्याचे लग्न शूरा खानसोबत झाले आहे. 57 वर्षीय अरबाजने मलायका अरोरासोबतचे पहिले लग्न संपल्यानंतर शूराशी नातं राखले. त्याची भावना सांगताना तो आनंद आणि चिंता व्यक्त करतोय.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

आमीर खान, सैफ अली खान यांच्याप्रमाणे पुन्हा एकदा लग्न करणारा अभिनेता या दोघांप्रमाणेच पुन्हा एकदा बाबा बनणार आहे. या अभिनेत्याचे पहिले लग्न हॉट अभिनेत्रीसोबत झाले होते आणि त्यांना एक मुलगा असून तो 22 वर्षांचा आहे.  या अभिनेत्याच्या भावाला जितके यश लाभले होते तितके यश त्याच्या वाट्याला आले नव्हते. पुन्हा बाप बनत असल्याचे कळाल्यानंतर मनात काय भावना निर्माण झाल्या असे विचारले असता या अभिनेत्याने सांगितले की जीव घाबराघुबरा होतोय. 

नक्की वाचा : 'मी श्रेयस अय्यरला नवरा मानते, त्याच्या दोन मुलांची आई' खळबळजनक दाव्यानंतर Bigg Boss स्पर्धक म्हणते...

चित्रपटप्रेमींनी हा अभिनेता कोण असेल हे आतापर्यंत ओळखलंच असेल, या अभिनेत्याचे नाव अरबाज खान असून त्याचे मलायका अरोरासोबत पहिले लग्न झाले होते. या दोघांना अरहान नावाचा मुलगा असून तो आता 22 वर्षांचा झाला आहे. मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज पुन्हा प्रेमात पडला होता. शूरा खान या मेकअप आर्टिस्टवर त्याचा जीव जडला होता आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Latest and Breaking News on NDTV

अरबाज खान याच्या वाट्याला 'मैने प्यार किया फिरसे' हा चित्रपट आला आहे. अरबाज खानच्या आयुष्याशी मिळता जुळता चित्रपट असल्याने मला तो आवडल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटामध्ये एक माणूस पुन्हा प्रेमात पडतो असे दाखवले आहे. अरबाजच्या आयुष्यातही तसेच झाले असून मलाईकानंतर तो शूराच्या प्रेमात पडला होता. या चित्रपटाची कथा आवडल्याने मी त्यात काम करण्यास होकार दिल्याचे अरबाजने सांगितले आहे. 

नक्की वाचा : 'या' एकमेव चित्रपटात शाहरुख आणि आमिर खान यांनी एकत्र केलं काम! तुम्हाला माहिती आहे का नाव?

अरबाज खान आणि शूराच्या लग्नाबद्दल फार लोकांना कल्पना देण्यात आली नव्हती. आपले नाते हे लोकांना कळू नये याची दोघांनी खबरदारी घेतली होती. आमचं नातं मला खासगी ठेवायचं होतं असं अरबाजने सांगितलं आहे. अनेक कलाकार आपले खासगी आयुष्य खासगीच राहावे यासाठी प्रयत्नशील असतात आणि मीही त्यापैकीच एक असल्याचे अरबाजने म्हटले आहे. 

Latest and Breaking News on NDTV

अरबाज खानचे वय 57 असून तो पुन्हा एकदा बाबा बनणार आहे. 2023 साली त्याने शूरासोबत लग्न केले होते. शूरा ही गर्भवती आहे हे कळाल्यानंतर माझ्यासकट घरची सगळी मंडळी खूश झाली आहेत असे त्याने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. एकीकडे आनंद वाटत असताना दुसरीकडे माझा जीव घाबराघुबराही होत असल्याचे त्याने म्हटले आहे. बऱ्याच वर्षानंतर मी पुन्हा बाप होत असल्याने निर्माण होणारी ही स्वाभाविक मानसिक स्थिती असल्याचे त्याचे म्हणणे आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com