
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता जेव्हा तीन खान म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान, आणि आमिर खान यांच्या नावाचा दबदबा होता. पण तुम्हाला हे समजल्यावर कदाचित आश्चर्य वाटेल की या तिन्ही सुपरस्टार्सनी एकत्र कधीही कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. सलमानने आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत काम केले आहे.
पण, शाहरुख आणि आमिर खान यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे? हा प्रश्न विचारला तर तुम्हाला नक्कीच डोकं खाजवावं लागेल. फक्त एका चित्रपटात दोघे काही काळ दिसले होते आणि हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट कोणता? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'तो' चित्रपट कोणता?
kingkhandiaries नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर 'पहला नशा' चित्रपटाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या चित्रपटात दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत होते, याव्यतिरिक्त शाहरुख खान आणि आमिर खान यांनी कॅमिओ रोल केला होता.
या व्हिडिओमध्ये राहुल रॉय, सुदेश बेरी आणि सैफ अली खान देखील त्यांच्यासोबत दिसत आहेत आणि सर्वजण दीपक तिजोरी यांच्याशी बोलताना आपापल्या चित्रपटांची नावे घेत आहेत. सोशल मीडियावर सैफ, आमिर आणि शाहरुखचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे आणि दीड लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. शाहरुख आणि आमिर यांनी चित्रपटात एकत्र काम करावं, अशी इच्छा अनेक युझर्सनी व्यक्त केली आहे.
1993 मध्ये झाला होता प्रदर्शित
'पहला नशा' चित्रपट 1993 मध्ये रिलीज झाला होता. आशुतोष गोवारिकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. . या चित्रपटात दीपक तिजोरी यांच्यासोबत अभिनेत्री पूजा भट्ट आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत होत्या, तर आमिर खान आणि शाहरुख खान कॅमिओमध्ये दिसले होते. चित्रपटात शाहरुख आणि आमिर व्यतिरिक्त सैफ अली खान, राहुल रॉय, सुदेश बेरी आणि जुही चावला यांसारख्या कलाकारांनी विशेष उपस्थिती लावली होती. परंतु इतकी मोठी स्टार कास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही आणि प्रेक्षकांना निराश केले.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
यानंतर शाहरुख खान आणि आमिर खान यांनी एकत्र कधीही मोठ्या पडद्यावर काम केले नाही. पण, ते एकत्र काम करतील अशी आजही त्यांच्या फॅन्सना अपेक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world