Dharmendra Latest News : धर्मेंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मागील आठवड्यात त्यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे काही दिवस ते रुग्णालयात दाखल होते. या काळात त्यांच्या तब्येतीबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या. आता ते बरे होऊन घरी आले आहेत. मात्र, अजूनही घरातूनच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांनी पडद्यावर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे आशा पारेख.
धर्मेंद्र आणि आशा पारेख यांच्या ‘आए दिन बहार के' या चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. पण शूटिंगदरम्यान एक मजेदार किस्सा घडला, जेव्हा आशा पारेख धर्मेंद्रवर नाराज झाली आणि रागात त्यांना धमकीही दिली. चला तर जाणून घेऊया, काय होता तो प्रकार ज्यामुळे धर्मेंद्रला आशाची नाराजी सहन करावी लागली.
नक्की वाचा >> Funny Video : नाकावरही आळस..शाळेत न जाण्यासाठी चिमकुलीने केला भन्नाट बहाणा, मम्मी-पप्पा कोमात अन् पोरगी जोमात!
‘आए दिन बहार के' या चित्रपटाचे शूटिंग दार्जिलिंगमध्ये सुरू होते. दर संध्याकाळी पॅकअपनंतर संपूर्ण टीम एकत्र येऊन रात्री उशिरापर्यंत दारू पित असे. यामुळे आशा पारेख यांना खूप त्रास होऊ लागला. रात्री दारू प्यायल्यानंतर सकाळी सेटवर येताना धर्मेंद्र कांदा चावत असत, जेणेकरून दारूचा वास येऊ नये. पण कांद्याचा तीव्र वास आणि दारूचा वास यामुळे आशा पारेख यांचा त्रास वाढत असे. शेवटी रागावून त्यांनी धर्मेंद्रला स्पष्ट सांगितले की, शूटिंग संपेपर्यंत त्यांनी दारू अजिबात प्यायली नाही पाहिजे.
नक्की वाचा >> Hema Malini Net Worth : धर्मेंद्र की हेमा मालिनी, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? पैशांचा आकडा वाचून थक्कच व्हाल
आशाच्या या कडक सूचना परिणामकारक ठरल्या आणि धर्मेंद्रने दारू पिणे बंद केले. नंतर आशा पारेख यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले की, दार्जिलिंगच्या कडाक्याच्या थंडीतही धर्मेंद्रने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि दारूला हात लावला नाही. सांगायचे झाले तर या चित्रपटात धर्मेंद्र आणि आशा यांच्यासोबत बलराज साहनी, राजेंद्र नाथ, सुलोचना लाटकर आणि राज मेहरा यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा जितकी गोड होती, तितकेच मजेदार हे पडद्यामागचे किस्सेही होते.