School Children Funny Video Viral : सोशल मीडियावर एका छोट्या मुलीचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती मुलगी आपल्या पप्पांना शाळेत न जाण्यासाठी एक मजेशीर बहाणा करताना दिसते. चिमुकली असा गोड आणि मजेदार बहाणा करताना दिसते, की तिचा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरलं नाही. व्हिडिओमध्ये ती मुलगी निरागसपणे पप्पांना म्हणते, “पप्पा, आज मला शाळेत पाठवू नका, आज माझा नाक बंद आहे.” जेव्हा पप्पा हसत हसत विचारतात की, शाळा तर उघडी आहे, तेव्हा ती मुलगी लगेच म्हणते, “शाळा तर उघडी असते, पण आज माझा नाक बंद आहे.”
मुलीचं बोलणं ऐकून पप्पा मजेशीर सुरात म्हणतात, “नाक बंद झालंय तर काय झालं? शाळा तर उघडी आहे. अभ्यास करशील तर नाक आपोआप उघडेल.” यावर ती मुलगी मोठ्या निरागसपणे विचारते, “मी रात्री झोपते तेव्हा नाक का नाही उघडत?” बाबा हसत म्हणतात, “कारण झोपताना नाकही झोपतं, नाहीतर नाकात डास घुसतील..चिमुलकीचा शाळेत न जाण्याचा हा बहाणा ऐकून सोशल मीडियावर अनेक लोक लोटपोट झाले आहेत.
नक्की वाचा >> बाईईई...काय हा प्रकार! 6 बायका एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट, व्हिडीओ पाहून लोक नवऱ्याला म्हणाले, रुको जरा रुको..
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ
हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वेगाने व्हायरल होत आहे. युजर्स त्या मुलीच्या हावभावांवर आणि तिच्या बोलण्याच्या गोडपणावर फिदा झाले आहेत. एका युजरने लिहिले, “इतके निरागस बहाणे तर आम्ही लहानपणीही करू शकलो नाही!” दुसऱ्याने लिहिले – “नाक बंद आहे, म्हणून शाळा बंद आहे, हा लॉजिक तर मुलांचाच असू शकतो!” तिसऱ्याने मजेत म्हटले, “आता पुढच्या वेळी ऑफिसला न जाण्यासाठी हाच बहाणा कामी येईल.”
नक्की वाचा >> Delhi Blast: 'या' अभिनेत्रीने दिल्ली स्फोटात गमावली सर्वात जवळची मैत्रिण, म्हणाली, "मागच्या आठवड्यातच तिने.."
क्यूटनेस आणि निरागसपणाचं परफेक्ट कॉम्बिनेशन
लहान मुलीचा निरागस आवाज आणि तिच्या पप्पांच्या कॉमेडी स्टाईल संवादाने हा व्हिडीओ खूप इंटरेस्टिंग बनला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांचं मनोरंजन तर झालंच आहे. पण लोकांना त्यांच्या बालपणींच्या आठवणींनाही ताजं केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world