जाहिरात

कधी? कुठे ?? कसा ??? भाग्यश्री लिमयेचा साखरपुडा झाला ?

छान साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज, केसात गजरा, हिरवा चुडा, नाकात नथ. गळ्यामध्ये लहासनाच पण सुंदर दिसणारा नेकलेस अशा वेषात भाग्यश्री आणि फिकट क्रीम कलरचा खादीचा कुर्ता पायजमा त्यावर जॅकेट अशा वेषातील अंकुश बहुगुणा असा फोटो पाहिल्यानंतर या दोघांचे चाहते आनंदाने वेडेपिसे झाले

कधी? कुठे ?? कसा ??? भाग्यश्री लिमयेचा साखरपुडा झाला ?
मुंबई:

Bhagyashree Limaye And Ankush Bahuguna: मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, अभिनेता अंकुश बहुगुणा सध्या त्यांच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आले आहेत. छान साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज, केसात गजरा, हिरवा चुडा, नाकात नथ. गळ्यामध्ये लहासनाच पण सुंदर दिसणारा नेकलेस अशा वेषात भाग्यश्री आणि फिकट क्रीम कलरचा खादीचा कुर्ता पायजमा त्यावर जॅकेट अशा वेषातील अंकुश बहुगुणा असा फोटो पाहिल्यानंतर या दोघांचे चाहते आनंदाने वेडेपिसे झाले होते. त्यात भर पड़ली ती भाग्यश्रीने लिहिलेल्या इन्स्टाग्राम पोस्टसाठीच्या कॅप्शनची. तिने म्हटलंय 'सब अरेंज्ड है.' यावरून भाग्यश्री आणि अंकुशने गुपचूप साखरपुडा उरकला अशी चर्चा सुरू झाली.

Latest and Breaking News on NDTV

नेमकं काय घडलं?

भाग्यश्रीने 5 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर अंकुशसोबतचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये भाग्यश्री साडीमध्ये आणि अंकुश कुर्त्यात दिसत आहेत. तिने या फोटोंना "पारिवारिकसा सब कुछ" असं कॅप्शन दिलं होतं. नंतर भाग्यश्रीने हे कॅप्शन बदलून 'सब अरेंज्ड है' असे क२प्शन दिलं. यामुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. सोशल मीडियावरील या फोटोमुळे अनेकांनी भाग्यश्री आणि अंकुशचं लग्न ठरलं असं समजून प्रश्न विचारले. काहींना हा कांद्यापोह्यांचा कार्यक्रम वाटला, तर काहींनी त्यांचा साखरपुडा झाल्याचं म्हटलं. रोहन जोशीने या पोस्टवर कॉमेंट करताना "समजत नाहीये की अभिनंदन करू की नको" अशी प्रतिक्रिया दिलीय. युट्युबर अभिषेक कपूरने 'हम साथ साथ हैं' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मग खरं काय आहे?

याचं उत्तर अंकुशनेच दिलं आहे. त्याने या फोटोवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की,'शूट आहे, लवकरच काहीतरी गोड घेऊन येत आहोत' भाग्यश्री आणि अंकुशने शेअर केलेले फोटो त्यांच्या आगामी शोच्या शूटिंगदरम्यान काढलेले आहेत. त्यांचा नवा शो 'फिल्टरकॉपी' चॅनेलवर येणार असून त्यासाठी त्यांनी हा लूक धारण केला होता. 'अरेंज्ड पॅच अप'मध्ये भाग्यश्री आणि अंकुश या दोघांची जोडी पाहायला मिळाली होती. यामध्ये पूर्वाश्रमीच्या प्रेयसी आणि प्रियकराचे लग्न ठरतं आणि मग पुढे धमाल उडते असं दाखवण्यात आलं आहे.

Latest and Breaking News on NDTV

हे फोटोशूट या शोच्या सिक्वेलसाठी असावं असाही अंदाज वर्तवला जात आहे. अंकुश आणि भाग्यश्रीच्या नव्या शोचं नाव काय असेल? त्यांचा लूक कसा असेल? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल. दरम्यान, भाग्यश्रीचा काही महिन्यांपूर्वी 'मुंज्या' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं होतं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com