यशपाल सोनकांबळे, पुणे:
ketan Agrawal Siya Goyal Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने देशभरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. केतन अग्रवाल या उद्योजकाच्या मुलाला त्याच्याच होणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच आता सिया आणि केतनच्या साखरपुड्यातील नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
Central Railway: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वेवर 7 वर्षानंतर मोठा बदल; प्रवास होणार सुखकर
साखरपुड्यातील VIDEO, सियाचे ते 2 शब्द..
सिया अग्रवाल आणि केतन चौधरी यांचा विवाह डिसेंबरमध्ये होणार होता, त्याआधीच सियाने आपल्या प्रियकराच्या मदतीने लोहगडावरुन केतनला ढकलून दिले. प्रेमप्रकरणामुळे हे लग्न सियाला मान्य नव्हते त्यामुळेच तिने हे क्रुर हत्याकांड घडवून आणले. केतनच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी केली होती. मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्यातील एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
या समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये सिया आणि केतन साखरपुड्याच्या सोहळ्यात स्टेजवर उभं असल्याचे दिसत आहे. यावेळी कार्यक्रमाची निवेदिका तिला केतन तुला का आवडतो? असा सवाल करते. यावेळी सिया "He Is Caring and Kind" असे म्हणत केतनच्या स्वभावाचे कौतुक करताना दिसते. हा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विविध स्तरांतून त्यावर चर्चा सुरू आहे. सियाचे हे शब्द ऐकून केतनही हसतो. मात्र तिच्या मनात असा काही कट शिजत असेल, आपल्याला आपलीच होणारी बायको इतक्या निर्घृणपणे संपवेल, असा विचारही त्याच्या मनात आला नसेल.
दरम्यान, केतन अग्रवाल (वय २६) याची १८ जून २०२६ रोजी लोहगडावर त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून ४०० फूट दरीत ढकलून हत्या केली . सुरवातीला हा अपघात असल्याचे भासवले गेले, मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यावर हे पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे उघड झाले. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात वडगाव न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे.
Mumbai Rain: मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचे तुफान! पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाकडून अलर्ट
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world