भोजपुरी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अमृता पांडेयने आत्महत्या केल्याने भोजपुरी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. अमृता 27 एप्रिल रोजी बिहारच्या भागलपूर परिसरात राहत्या संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळली. पोलिसांना घटनेची माहिती मिळतात, त्यांनी घटनास्थळी धाव मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. अमृताच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. तिने असं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमृताचं व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल
अमृताने आत्महत्येच्या काही वेळ आधी एक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. यावरुन देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तिने स्टेटसमध्ये ठेवलेल्या मेसेजनुसार, दोन नौकांमध्ये तिचा प्रवास सुरु होता. मात्र एक नौका बुडवून तिने तिचा प्रवास सोपा केला आहे. 2022 मध्ये अमृताचं लग्न अॅनिमेशन इंजीनिअर असलेल्या चंद्रमणि झांगड यांच्याशी झालं होतं.
(नक्की वाचा - मूर्खपणा बंद कर! म्हणत पहिल्या पत्नीने आमीर खानच्या लगावली होती कानशिलात, कारण...)
अमृताच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार, ती तिच्या करिअरबाबत चिंतेत होती आणि डिप्रेशनमध्ये होती. तिच्यावर उपचार देखील सुरु होते. काम मिळत नसल्याने देखील ती चिंतेत होती.
अमृताच्या कुटुंबियांनी पुढे म्हटलं की, ती डिप्रेशनमध्ये असली तरी तिच्या लेटेस्ट वेबसीरिज 'प्रतिशोध'च्या रिलीजची आतुरतेने प्रतीक्षा करत होती. त्यामुळे तिने असं टोकाचं पाऊल उचलल्याने आम्हाला देखील धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच्या लहान बहिणीच्या लग्नात ती अत्यंत खूश आणि उत्साही दिसत होती.
(नक्की वाचा: महादेव बेटिंग अॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानला अटक, 40 तास पोलीस करत होते पाठलाग)
अमृताने आत्महत्येचा निर्णय का घेतला, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सर्व बाजूने तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.