...म्हणून तुम्ही Legend! मराठीतील एका शब्दाचा चुकीचा उच्चार, बिग बींनी सर्वांसमोर मागितली माफी, Video Viral

सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडिओला मोठा प्रतिसाद दिला आहे. म्हणून तुम्ही Legend आहात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या व्हिडिओवर येत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार म्हणून (Amitabh Bachchan on Social Media) यांना ओळखलं जातं. एक जबरदस्त कलाकारासह त्यांच्यात अत्यंत विनम्रताही आहे. त्यांच्यातील हिच माणुसकी त्यांच्या सोशल मीडियावरही झळकत असते. बिग बी सोशल मीडियावर नियमित व्यक्त होत असतात. चाहतेदेखील त्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर असतात.  

काही दिवसांपूर्वी बिग बींनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला होता. यामध्ये त्यांनी जनतेला एक मेसेज दिला होता. हा मेसेज त्यांनी मराठी आणि हिंदीतूनही दिला होता. मात्र मराठीतून संदेश देत असताना त्यांनी एक शब्द चुकीचा उच्चारला. मात्र आपली चूक दुरुस्त करीत बिग बींनी आणखी एक व्हिडिओ करीत आपली चूक मान्य केली आणि तो शब्द सुधारून वाक्य पुन्हा म्हणून दाखवलं. त्यांच्या या व्हिडिओचं कौतुक केलं जातं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडिओला मोठा प्रतिसाद दिला आहे. म्हणून तुम्ही  Legend आहात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या व्हिडिओवर येत आहेत.

नेमका कोणता शब्द चुकला?
अमिताभ बच्चन यांनी एक संदेश देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये 'मी कचरा करणार नाही' असं ते या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. हेच वाक्य त्यांनी हिंदी आणि मराठीतूनही म्हटलं. मात्र मराठीतून म्हणत असताना त्यांनी कचरा हा शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारला. याबाबत गायक सुदेश भोसले यांनी बिग बींना त्यांची कचरा हा शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारल्याचं सांगितलं.

त्यामुळे बिग बींनी आपली चूक दुरुस्त करीत आणखी एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी सुदेश भोसलेंनी चूक दाखवल्याचं सांगितलं आणि मराठीतील वाक्य योग्य पद्धतीने म्हणून दाखवलं.