Jay dudhane Arrested: मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी बिग बॉस सीझन ३ चा उपविजेता, अभिनेता जय दुधाणे याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जय दुभाणे याच्यावर सुमारे पाच कोटींच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणात पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्या आहेत.
मराठी अभिनेत्याला अटक
समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या रांगड्या शरीरयष्टीने आणि 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात गाजवलेल्या कामगिरीमुळे चर्चेत आलेला अभिनेता जय दुधाणे याला ठाणे पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. सुमारे ५ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात जय दुधाणेवर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
KBC 17 : पाणावलेल्या डोळ्यांनी अमिताभ बच्चन यांचा KBC ला निरोप; म्हणाले, इतक्या लवकर...
अभिनेता जय दुधाणे आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याने एकाच दुकानाची बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक ग्राहकांना विक्री करून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये (FIR) केवळ जय याचेच नाव नसून, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. जयचे आजी-आजोबा, आई आणि बहीण यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
11 दिवसांपूर्वीच अडकला विवाहबंधनात..
गेल्याच आठवड्यात जय दुधाणे विवाहबंधनात अडकला होता. 24 डिसेंबर 2025 रोजी जयने दुधाणे याने त्याची प्रेयसी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर 11 दिवसातच त्याच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
Aishwarya Rai: लग्नानंतर करिअरमध्ये ब्रेक का घेतला? ऐश्वर्या रायने पहिल्यांदा मोठा खुलासा केला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world