सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपतीच्या सीजन १७'ला अलविदा म्हटलं आहे. या आयकॉनिक क्विझ शोमध्ये आपल्या प्रवासाबद्दल बोलताना बिग बी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. बिग बींचं मनोगत ऐकल्यानंतर स्पर्धक, प्रेक्षकांसह अमिताभ बच्चन आपले अश्रू रोखू शकले नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी आयुष्यातील एक तृतीयांश काळ केबीसीमध्ये घालवलेले क्षण आशीर्वाद असल्याचं मानलं.
अमिताभ बच्चनने प्रेक्षकांचे मानले आभार
या व्हिडिओमध्ये बिग बी म्हणतात, कधी कधी आपण एखादा क्षण इतका मनापासून जगतो आणि त्यात हरवून जातो. जेव्हा शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो तेव्हा मात्र हे सर्व नुकतच सुरू झाल्यासारखं वाटतं. सगळं काही कालच घडल्यासारखं वाटतंय. आज या खेळाचा शेवटचा दिवस आहे. माझ्या आयुष्याचा एक तृतीयांश, खरं तर एक तृतीयांशपेक्षा जास्त काळ, तुम्हा सर्वांसोबत घालवणं हे माझ्यासाठी एक मोठं भाग्य आहे."
बिग बी केबीसीला अलविदा म्हणताना भावुक झाले...
ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमात मी जे काही म्हणत होतो, ते मनापासून होतं. तुम्ही मोकळ्या मनाने माझं स्वागत केलं. मी जेव्हा हसलो तुम्हीही माझ्यासोबत हसला. जेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले, तुमचेही डोळे पाणावले. या प्रवासात तुम्ही माझे साथीदार बनलात.
अमिताभ बच्चन ३० मिनिटं गायले...
अमिताभ बच्चन यांचा नातू अभिनेता अगस्त्य नंदा याने 'कौन बनेगा करोडपती १७' च्या ग्रँड फिनालेमध्ये विशेष उपस्थिती लावली होती. किकू शारदानेही आपल्या विनोदाने कार्यक्रमात मजा आणली. दरम्यान, बिग बींनी ३० मिनिटांचा संगीतमय कार्यक्रम सादर केला, ज्यामध्ये त्यांनी "रंग बरसे," "होली खेले रघुवीरा," "चलत मुसाफिर," आणि "मेरे अंगने में" सारखी गाणी गायली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world