आर्या जाधवचं अमरावतीत जंगी स्वागत, बिग बॉसबाबत म्हणाली...

आर्याचं स्वागत करण्यासाठी अमरावतीकर एकत्र जमले होते. ओपन जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात आर्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढले.

Advertisement
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती

‘बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीजनची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात अमरावतीची रॅपर आर्या जाधव हिला अचानक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. प्रतिस्पर्धी निक्की तांबोळीच्या कानशिला लगावल्याने आर्याला बाहेर पडावं लागलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आर्या जाधव पहिल्यांदाच अमरावतीमधील आपल्या गावी दाखल झाली. यावेळी अमरावतीकरांनी मोठी गर्दी करत तिचं स्वागत केलं.  

आर्याचं स्वागत करण्यासाठी अमरावतीकर एकत्र जमले होते. ओपन जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात आर्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढले. तर आर्याने रॅप करत आपली एक झलक सर्वांना दाखवली. अशा पद्धतीने अमरावतीकरांनी आर्याचं जोरदार स्वागत केलं.  

(नक्की वाचा-  सोशल मीडियावर Bigg Boss Boycott ट्रेंड; आर्याला घराबाहेर काढल्यामुळे चाहत्यांमध्ये संताप!)

आर्यांने याबाबत म्हटलं की, मला खूप छान वाटतंय. अमरावती माझी जागा आहे. अमरावतीकर माझे लोक आहे. इथे आल्यानंतर एवढं प्रेम मिळेल असं मला वाटलं नव्हतं. ज्याप्रकारे मला प्रेम मिळतंय ते पाहून माझं मन भरुन आलंय.  तुमच्यामुळे हा खास क्षण मला अनुभवता आला आहे, असं म्हणत आर्याने सर्वांचे मनापासून आभार मानले.

(नक्की वाचा: Punha Ekda Saade Maade Teen: पुन्हा एकदा साडे माडे तीन सिनेमाचा पार पडला मुहूर्त, रातोरात स्टार झालेली अभिनेत्री झळकणार?)

वाईल्ड कार्डद्वारे परत बोलवावं

बिग बॉसमध्ये मी खूप चांगली खेळली असते. बिग बॉसला एवढचं सांगेल की वाईल्ड कार्ड किंवा पुढच्या वर्षी संधी दिली तरी चालेल. आम्ही खेळणारे लोक आहोत. वाईल्ड कार्ड पाहिजे का असं आर्याने अमरावतीकरांना विचारलं, त्यावेळी सर्वांना 'हो' म्हणत आर्याला पाठिंबा दिला.  

बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

एका टास्कदरम्यान आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावली. कॅप्टन्सी टास्कदरम्यान हा प्रकार घडला. यानंतर निक्कीने खोलीबाहेर आल्यानंतर बिग बॉसकडे याबाबत तक्रार केली. या सर्व प्रकारानंतर आर्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित करण्यात आलं.

Topics mentioned in this article