मराठी मालिकेमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणारी जान्हवी किल्लेकर हिने 2024 च्या मराठी बिग बॉसमध्ये मोठा राडा घातला होता. यामध्ये तिने अनेकांबद्दल कमेंट केली होती. जोरजोरात भांडण करणे, समोरच्याला टोचून बोलणे यामुळे काही जणांकडून तिच्या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान जान्हवीची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. जान्हवीने आपला वैयक्तिक अनुभव यावेळी शेअर केला आहे. लग्नानंतर तिने अत्यंत साधारण आयुष्य जगल्याचं ती या मुलाखतीत सांगत आहे. यावेळी ती म्हणाली, लग्नानंतरची सात वर्षे मी अक्षरश: कामवाल्या बाईसारखे राहिले. मी लग्नानंतर चाळी मी दिवसभर साडीवर असायचे. चूल आणि मूल इतकच माझं काम होतं. घर सांभाळणं, स्वयंपाक करणं इतकच माझं काम होतं. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, अंगावर गलिच्छ साडी... पदर कसातरी खोचलेला..दिवसभरात घरातली कामं करावी लागत होती. भांडी घासा, कपडे धुवा, स्वयंपाक करा.
नक्की वाचा - तिन्ही खानांसोबत काम केलं, IPL टीमची मालकीण आता राजकारणात ? अभिनेत्रीने थेट दिलं उत्तर
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा...
लग्नानंतरची सात वर्षे मी असंच आयुष्य काढल्याचं जान्हवीने यावेळी सांगितलं. ती पुढे म्हणाली, पण मी स्वत:चं आयुष्य बदललंय...माणसाला एकच आयुष्य मिळतं. आपण पुन्हा जन्म घेऊ की नाही माहीत नाही.. आता जे आयुष्य मिळालं ते जगा... स्वतासाठी जगा.. तुम्हाला ज्याची आवड आहे ते करा. फक्त घरात आणि मुलात अडकून पडू नका.
कोण आहे जान्हवी किल्लेकर?
जान्हवी किल्लेकर हिने भाग्य दिले तू मला या मालिकेत सानिया या खलनायिकेची भूमिका साकारली होती. जान्हवीच्या नवऱ्याचं नाव किरण किल्लेकर असून तो त्याचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. जान्हवीला ईशान नावाचा मुलगा असून ती सोशल मीडियावर पती-मुलाचे फोटो शेअर करीत असते.