जाहिरात

तिन्ही खानांसोबत काम केलं, IPL टीमची मालकीण आता राजकारणात ? अभिनेत्रीने थेट दिलं उत्तर

अभिनेत्रीला वारंवार ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तिने याबाबत संताप व्यक्त केला आहे.

तिन्ही खानांसोबत काम केलं, IPL टीमची मालकीण आता राजकारणात ? अभिनेत्रीने थेट दिलं उत्तर

Actress Preity Zinta in Politics : शाहरूख असो, सलमान की आमिर खान... कोणत्याही स्टार खानसोबत परफेक्ट जोडी ठरलेली अभिनेती प्रीती झिंटा हिने आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये मोठं वळण घेतलं अन् थेट आयपीएलच्या मैदानात जाऊन पोहोचली. प्रीती झिंटा सध्या आयपीएलची टीम किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालक आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'एक्स'वरील Ask Me anything या सेशन दरम्यान प्रीती झिंटाने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान एका चाहत्याने तिला भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल केला होता. ज्यावर प्रीती झिंटा आधी तर संतापली मात्र  त्यानंतर तिने माफीही मागितली.  यादरम्यान ती म्हणाली, मी घेतलेला प्रत्येक निर्णय हा राजकीय दृष्टीकोनातून पाहिला जातो, यावर स्पष्टीकरण देऊन आता मी दमलेय. 

Maharashtrachi Hasya Jatra Video : 'हास्यजत्रा' पाहता पाहता अर्धांगवायुचा रुग्ण उठून उभा राहिला; 'तो' किस्सा होतोय व्हायरल

नक्की वाचा - Maharashtrachi Hasya Jatra Video : 'हास्यजत्रा' पाहता पाहता अर्धांगवायुचा रुग्ण उठून उभा राहिला; 'तो' किस्सा होतोय व्हायरल

प्रीती झिंटा खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार? उत्तरात नेमकं काय म्हणाली?

सोशल मीडियाची हीच अडचण आहे. आज-काल कोणीही विचार न करता दुसऱ्यांचे निर्णय स्वत:च घेतो. मी आधीही यापूर्वी अनेकदा बोललेय अन् आताही तेच सांगते. मंदिरात किंवा महाकुंभमध्ये जाणं ही माझी ओळख आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो. मात्र याचा अर्थ मी राजकारणात येणार असा होत नाही. माझी मुलं अर्धी भारतीय आहेत, ही बाब त्यांनी विसरू नये. माझे पती अज्ञेयवादी आहेत. आम्ही आमच्या मुलांना हिंदू धर्मात राहून मोठं करीत आहोत. मात्र मला यासाठी टीका सहन करावी लागतेय आणि मी मनापासून, आनंदाने घेतलेले निर्णय राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जातात. मुलांना त्यांचं मूळ आणि धर्माबद्दल शिकवण्यासाठी मला वारंवार उत्तरं द्यावी लागतात, याचं वाईट वाटतं. 


7 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर प्रीती झिंटाची वापसी...

प्रीती झिंटाने 2016 मध्ये जीन गुडेनफसोबत लग्न केलं होतं. त्यांना जिया, जय ही दोन मुलंही आहेत. 11 नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांना ही दोन मुलं झाली. प्रीती सात वर्षांच्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर वापसी करण्याची तयारी करीत आहे. ती राजकुमार संतोषी याच्या 'लाहोर 1947' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओल, शबाना आझमी आणि अली फजलही आहेत. आमिर खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

प्रश्न ऐकून प्रीती झिंटा संतापली...


प्रीती झिंटाने एक्सवरील आस्क एनिथिंग सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला भविष्यातील राजकीय प्रवेशावर सवाल उपस्थित केला. चाहत्याने तिला विचारलं, भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करणार? या प्रश्नावर प्रीती झिंटा नाराज झाली आणि भलं मोठं उत्तर दिलं. यासह 'राजकारणात प्रवेश करणार नाही' हे तिने स्पष्ट केलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: