Suraj Chavan Wedding: बिग बॉस 5 चा विजेता सूरज चव्हाण आज लग्नबंधनात अडकणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सूरजच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. सूरज चव्हाणचं केळवण, लग्नाची शॉपिंग, प्री-वेडिंग आणि नवीन घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सेलिब्रिटी लग्नाप्रमाणे सूरज आणि संजना यांच्या लग्नाची प्रत्येक अपडेट समोर येत आहे. अखेर आज सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजच्या लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हजर राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर तशी निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे.
सूरज चव्हाणच्या लग्नाचा कार्यक्रम
सूरजचा साखरपुडा, हळद आणि लग्नसमारंभ आज एकाच दिवशी पार पडणार आहे. साखरपुडा समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता, हळदी समारंभ दुपारी 2 वाजता आणि लग्नसमारंभ संध्याकाळी 6.11 वाजता पार पडणार आहे. पुण्यातील सासवड येथील माऊली गार्डन हॉल येथे संजना आणि सुरजचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे.
(नक्की वाचा- Suraj Chavan's Pre-Wedding Shoot: सूरज-संजनाची 'लय भारी' स्टाईल; प्री-वेडिंगचा VIDEO व्हायरल)
व्हायरल झालेल्या पत्रिकेत कुणाची नावे?
- अजित पवार
- अक्षय कुमार
- रितेश देशमुख
- अशोक सराफ
- पंढरीनाथ कांबळे
- केदार शिंदे
- वर्षा उसगांवकर
- अभिजीत सावंत
- उत्कर्ष शिंदे
- अंकिता वालावलकर
- आर्या जाधव, इरीना
- अभिषेक करंगुटकर
- अरबाज पटेल
- निखिल दामले
- वैभव चव्हाण
- जान्हवी किल्लेकर
- निक्की तांबोळी
- धनंजय पोवार
- संग्राम चौगुले
- पुरुषोत्तम दादा पाटील
- योगिता चव्हाण
- घनश्याम दरोडे
- कुणाल भगत
या सेलिब्रिटींशिवाय सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, विजय शिवतारे, संजय जगताप, अशोक टेकवडे, दौलत शितोळे, मोहन मदने, संग्राम मोरे, अॅड. राहुल बनकर, नितीन यादव, मंदार सिकची, ओंकाळ जावळे, दीपक जावळे, पोपटराव खोमशे, वैभव मोरे, अशोक खोमने, किरण खोमणे यांनी नावे व्हायरल झालेल्या पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून आहेत.