Bigg Boss Marathi New Season Day 1 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन 28 जुलै रोजी सुरू झाला आहे. यंदा बिग बॉसच्या घरामध्ये 16 स्पर्धक दाखल झाले आहेत. पहिल्याच दिवशी सदस्य चक्रव्युहात अडकल्याचे दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्यांना पाणी-नाश्ता मिळत नसल्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदस्यांची चांगलीच चिडचिड झाल्याचे दिसले. एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच सदस्यांना आश्चर्याचे मोठे धक्के बसल्याचे पाहायला मिळाले.
(नक्की वाचा: नताशासोबत घटस्फोटानंतर हार्दिक अनन्या पांडेला डेट करतोय? जवळच्या व्यक्तीने सांगितलं...)
पहिल्या दिवशी दोन अभिनेत्रींमध्ये वाद?
मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonker) आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यामध्ये पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' झालेले पाहायला मिळणार आहे.
घर म्हटले की भांड्याला भांडे लागतेच. मग 'बिग बॉस मराठी'चे (Bigg Boss Marathi) घर तरी याला अपवाद कसे ठरू शकते. येथेही घरातही सदस्यांमध्ये 'तू तू मै मै' झालेले पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात वर्षा उसगांवकर मेकअप करत होत्या. या दरम्यान निक्की येऊन त्यांना म्हणते की,"तुम्ही कृपया नंतर मेकअप करा". त्यावर वर्षा निक्कीला म्हणतात की,"मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे... तू व्यवस्थित तयार झालीस".
पुढे निक्की वर्षा यांना म्हणतेकी,"लिपस्टिक नंतर लावा..आधी बाहेर येऊन बसा..लिपस्टिक कोणी नाही पाहत तसंही..."
(नक्की वाचा: "कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात हा भगवा रंग...", रोख कुणाकडे? 'धर्मवीर 2'च्या डायलॉगची चर्चा)
बिग बॉस काय देणार आदेश
सर्वजण लिव्हिंग रूममध्ये वर्षा यांची वाट पाहत बसले आहेत. कारण घरातील सर्व सदस्य एकत्र जमल्यानंतर 'बिग बॉस' काही तरी आदेश देणार आहेत. त्यांच्या आदेशाची सर्व सदस्य आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व सदस्य बेडरूममध्ये मेकअप करणाऱ्या वर्षा उसगांवकर यांना बाहेर बोलवताना दिसत आहेत. तुमच्यामुळे 'बिग बॉस'देखील थांबले आहेत, असं घरातील अन्य सदस्य वर्षा यांना म्हणत आहेत. आता वर्षा लिव्हिंग एरियामध्ये आल्यावर 'बिग बॉस' काय आदेश देणार हे जाणून घेण्यास 'बिग बॉस'प्रेमी उत्सुक आहेत.