जाहिरात

नताशासोबत घटस्फोटानंतर हार्दिक अनन्या पांडेला डेट करतोय? जवळच्या व्यक्तीने सांगितलं...

नताशासोबत घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या कार्यक्रमात दिसला. या लग्न सोहळ्यातील हार्दिकचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.

नताशासोबत घटस्फोटानंतर हार्दिक अनन्या पांडेला डेट करतोय? जवळच्या व्यक्तीने सांगितलं...

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नताशा स्टॅनकोविकसोबतच्या घटस्फोटानंतर पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनंत अंबानींच्या लग्नातील व्हायरल व्हिडीओ आणि फोटोवरुन अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.  आता अनन्या पांडेच्या जवळच्या व्यक्तीने या चर्चेबाबत मोठा खुलासा केला आहे.

हार्दिक-अनन्या एकाच व्हिडीओत दिसले 

नताशासोबत घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या कार्यक्रमात दिसला. या लग्न सोहळ्यातील हार्दिकचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. एका व्हिडिओमध्ये अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या एकत्र नाचताना दिसले. या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. 

(नक्की वाचा - सारा अली खानसोबत काय घडलं? विमान प्रवासात संतापली अभिनेत्री, Inside Video)

दोघे एकमेकांना डेट करत आहेत का?

मात्र आता अनन्या पांडेच्या जवळच्या मैत्रिणीने बॉलिवूड लाइफशी संवाद साधला आणि या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. तिने सांगितले की, हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे एकमेकांना डेट करत नाहीत. 

(नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )

अनन्याच्या मैत्रिणीने सांगितले की, अनन्या पांडे ही मनमिळावू स्वभावाची आहे. त्यामुळे ती सगळ्यांसोबत मिसळते. यापेक्षा हार्दिक पांड्याशी तिचा काहीही संबंध नाही. तिने पुढे म्हटले की, अनन्या पांडे सध्या तिच्या करिअरबाबत खूप गंभीर आहे आणि तिला फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तिच्या हातात काही चांगले चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्ट्स आहेत. तिला तिथे चांगलं काम करायचं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
वादळी पाऊस आणि वाऱ्याची पर्वा न करता काम करणारा मुंबईकर, Video शेअर करत जॅकी म्हणाला...
नताशासोबत घटस्फोटानंतर हार्दिक अनन्या पांडेला डेट करतोय? जवळच्या व्यक्तीने सांगितलं...
bollywood actress-sara-ali-khan-angry-on-flight-air-hostess-for-spoiling-her-dress-inside-video-viral
Next Article
सारा अली खानसोबत काय घडलं? विमान प्रवासात संतापली अभिनेत्री, Inside Video