Suraj Chavan-Gautami Patil : सूरज चव्हाणची 'सबसे कातील' फॅन, गौतमी पाटील सोबतचा VIDEO तुफान व्हायरल

Gautami Patil-Suraj Chavan : गौतमीने काही तासांपूर्वी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 43 लाखांहून अधिक लोकांना हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे. तर या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 77 हजार लोकांनी लाईक केलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Gautami Patil Suraj Chavan

बिग बॉस मराठी सीजन 5 चा  विजेता सूरज चव्हाणची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय क्षेत्रापासून ते मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सूरजची आतापर्यंत भेट घेतली आणि त्याचे अभिनंदन केले. सूरज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासूनच भेटीगाठींमध्ये व्यस्त आहे. सूरज आणि महाराष्ट्राची प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील यांची नुकतीच भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सूरज चव्हाण सोबतच्या भेटीचा व्हिडीओ गौतमी पाटीलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय त्यानुसार, गौतमी पाटीलच्या ओबी व्हॅनमध्ये दोघांची भेट झाल्याचं दिसून येतंय. यावेळी सूरज आणि गौतमीच्या जवळेची काहीजण उपस्थित होते.  गौतमी सूरजसोबत हसत खेळत  गप्पा मारताना दिसत आहेत. तर सूरज नेहमीप्रमाणे शांत हसतमुखाने तिचं बोलणं ऐकताना दिसतोय. दोघांना एकमेकांना भेटून झालेल्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 

गौतमीने काही तासांपूर्वी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 43 लाखांहून अधिक लोकांना हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे. तर या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 77 हजार लोकांनी लाईक केलं आहे. 

(नक्की वाचा-  सूरज चव्हाणला अजित पवारांकडून मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट)

याआधी सूरजने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाण याच्यासोबत बराच वेळ गप्पा मारल्या होत्या. सूरज चव्हाणला गावी एक घर बांधायचं आहे, हे त्याने अनेकदा बोलून दाखवलं आहे. बिग बॉसच्या घरात असाताना देखील त्याने हे बोलून दाखवलं होतं. हीच गोष्ट लक्षात ठेवून अजित पवार यांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्याच शब्द दिला आहे. अजित पवारांनी सुरज चव्हाण याच्या घराच्या जागेची पाहणी करण्यासाठी टीम देखील पाठवली होती. या टीमच्या मार्फत जागेचा सर्वे करून लवकरच सूरज चव्हाण याला घर बांधून दिलं जाणार आहे. याबाबत सूरजने देखील अजित पवारांचे आभार मानले आहेत. 

(नक्की वाचा-  बिग बॉसच्या ट्रॉफीनंतर सूरज चव्हाणला आता मिळणार आणखी एक सरप्राइज)

बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणने किती पैसे कमावले?

सूरज चव्हाण याला ट्रॉफीसह 14.50 लाख रुपये मिळाले. सोबतच इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाखांचं ज्वेलरी वाऊचरही मिळाले होते. सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठी सीजन 5 मधून एकूण 24.6 लाख रुपये मिळाले. तर कोई मोई डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, त्याला दर आठवड्याला 25 हजार रुपये मिळाले होते. अंतिम आठवड्यापर्यंत त्याची एकूण किंमत 2.5 लाखांपर्यंत जाते.