जाहिरात

बिग बॉसच्या ट्रॉफीनंतर सूरज चव्हाणला आता मिळणार आणखी एक सरप्राइज

बिग बॉस मराठी पाचव्या सीजनचा विजेता सूरज चव्हाण याला ट्रॉफीसह 14.50 लाख रुपये मिळाले. सोबतच इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाखांचं ज्वेलरी वाऊचरही मिळाले होते.

बिग बॉसच्या ट्रॉफीनंतर सूरज चव्हाणला आता मिळणार आणखी एक सरप्राइज
छत्रपती संभाजीनगर:

बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सुरज चव्हाण हा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. त्याचे फॅन्सही वाढले आहेत. बिग बॉस जिंकल्यानंतर त्याने एकूण 24.6 लाख रुपये जिंकले. असं असलं तरी सूरजवर होणारा बक्षिसांचा वर्षाव काही थांबताना दिसत नाही. त्याला आता आणखी एक सरप्राईज मिळणार आहे. या सरप्राईज मुळे त्याची मोठी चिंता ही मिटणार आहे. त्याला हे सरप्राईज जर कोणी दिले असेल तर ते हुंडाई कंपनीने दिले आहे.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सूरज चव्हाण सर्व सामान्य कुटुंबातून आला आहे. गरिबी ही त्याच्या पाचवीला पुजलेली. तो त्याच्या मेहनतीने पुढे आला. रिल स्टार म्हणून तो सध्या सुपरिचित आहे. त्याचा मानणारा मोठा वर्ग आहे. सूरजला राहाण्यासाठी पक्क घरही नव्हतं. मात्र आता त्याच्या घराचे बांधकाम सुरू झाले आहे. त्याला आता हक्काचं घर मिळणार आहे. पण या घरात लागणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याला हुंडाई कंपनीने देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले

त्यात एसी, फ्रिज, वॉशिंग मशिन, मोठा एलसीडी टीव्ही, याचा समावेश आहे. या सर्व वस्तू त्याच्या नव्या घरात हुंडाई कंपनी तर्फे देण्यात येणार आहेत. जे तळागाळातले तरूण आपल्या मेहनतीने पुढे येता. राज्यात देशात आपली छाप पाडतात अशा तरूणांना हुंडाई कंपनी प्रोत्साहन देत असते. दर वर्षा असा तरूणांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांना हे बक्षिस दिले जाते. या वेळी कंपनीने सूरज चव्हाणची निवड केली आहे. त्याला आता या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेट दिल्या जाणार आहेत.   

ट्रेंडिंग बातमी - 'मी नक्कीच मुख्यमंत्री होणार' दावा कोणाचा? प्रतिक्रिया काय आली?

सूरज चव्हाण दहा आठवडे बिग बॉसच्या घरात राहीला होता. या काळात त्याला जनतेने मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं होतं. त्या जोरावर त्याने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या हाती घेतली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी पाचव्या सीजनचा विजेता सूरज चव्हाण याला ट्रॉफीसह 14.50 लाख रुपये मिळाले. सोबतच इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाखांचं ज्वेलरी वाऊचरही मिळाले होते. 

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण योजना भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी' सरकारला थेट नोटीस

सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठी सीजन 5 मधून एकूण 24.6 लाख रुपये मिळाले. तर कोई मोई डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, त्याला दर आठवड्याला 25 हजार रुपये मिळाले होते. अंतिम आठवड्यापर्यंत त्याची एकूण किंमत 2.5 लाखांपर्यंत जाते. अभिजीत सावंत मात्र हरल्यानंतरही मालामाल झाल्याचं दिसतं. त्याची एकूण शोची कमाई सूरजपेक्षा 14 टक्क्यांनी जास्त आहे.