'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या विवाह सोहळ्यामुळे चर्चेत आहे. 29 नोव्हेंबर 2025 रोजी सासवड येथे मोठ्या थाटामाटात सूरजचं लग्न संजना नावाच्या त्याच्या चुलत मामाच्या मुलीसोबत पार पडलं. या विवाह सोहळ्याला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि 'बिग बॉस मराठी'चे स्पर्धक उपस्थित होते. यापैकीच एक म्हणजे, याच पर्वातील स्पर्धक जान्हवी किल्लेकर. मात्र हीच जान्हवी सूरजच्या लग्नानंतर रुग्णालयात दाखल झाली आहे.
जान्हवी किल्लेकरचा लग्नातील उत्साह
जान्हवी किल्लेकर हिने सूरजच्या लग्नातील प्रत्येक विधीचा खूप आनंद घेतला. मेंदी, हळद, साखरपुडा आणि लग्नाची वरात या सर्व समारंभांमध्ये ती सक्रियपणे सहभागी झालेली पाहायला मिळाली. तिने सूरज आणि त्याच्या पत्नीसोबत डान्सही केला, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
(नक्की वाचा- Viral VIDEO: एक फ्लिप अन् सगळ्यांच्या तोंडून निघालं ओsss! आजींच्या भन्नाट डान्स व्हिडीओला 47 लाख व्ह्यूज)
गर्दी पाहून संतापली
लग्नसोहळ्यात जान्हवी खूप उत्साहात आणि आनंदी दिसत होती, यासाठी चाहत्यांनी तिचे कौतुकही केले. मात्र, लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यावर जान्हवीने उपस्थितांना गर्दी न करण्याचे आवाहन देखील केले आणि रागही व्यक्त केला होता. या संपूर्ण सोहळ्यात जान्हवीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
जान्हवी रुग्णालयात दाखल
लग्नसोहळा आटोपल्यानंतर आता जान्हवी किल्लेकर आजारी पडल्याची बातमी समोर आली आहे. लग्नातील अति उत्साहामुळे आणि धावपळीमुळे तिची तब्येत बिघडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिला उपचारासाठी मुंबईतील 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' या प्रसिद्ध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जान्हवीची रुग्णालयातून पोस्ट
रुग्णालयाच्या बेडवर असताना जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती रुग्णालयाच्या बेडवर दिसत असून, तिने "नजर इज रिअल" असे कॅप्शन याला दिले आहे.
(नक्की वाचा- 19 मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओचा विषय काय? VIDEO मिळवण्यासाठी प्रयत्न कराल तर जेलमध्ये जाल)
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिलं की, "तू एखाद्यावर प्रेम किती करते हे सुरजच्या लग्नात दिसले, लवकर बरी हो." आणखी एकाने लिहिलं की, "छान दिसत होती म्हणून नजर लागली आहे." दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, "लग्नात भरपूर नाचल्याचा परिणाम."