जाहिरात

19 मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओचा विषय काय? VIDEO मिळवण्यासाठी प्रयत्न कराल तर जेलमध्ये जाल

Viral Video: भारतीय कायद्यात आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ शेअर करण्यावर आणि प्रसारित करण्यावर कडक शिक्षेची तरतूद आहे. सोशल मीडिया युजर्सनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, फॉरवर्ड किंवा शेअर करणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी होण्यासारखे आहे.

19 मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओचा विषय काय? VIDEO मिळवण्यासाठी प्रयत्न कराल तर जेलमध्ये जाल
  • सोशल मीडिया पर 19 मिनट 34 सेकंड का एक आपत्तिजनक वीडियो वायरल हो रहा है, जिससे कई लड़कियों की बदनामी हो रही है
  • वीडियो में एक कपल वल्गर बातें करते हुए आपत्तिजनक स्थिति में दिख रहा है, जिसकी असली जानकारी अभी तक नहीं मिली है
  • सोशल मीडिया यूजर वीडियो से मिलती-जुलती दिखने वाली लड़कियों को निशाना बना रहे हैं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सोशल मीडियावर सध्या काही आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स आणि त्यासंबंधीत अफवांमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. रील बनवणाऱ्या अनेक तरुणींना या व्हिडिओमधील व्यक्तींशी साम्य असल्याच्या कारणावरून सोशल मीडियावर बदनामी आणि अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन गैरवर्तनाच्या वेळी लोक कायद्याचे गंभीर परिणाम विसरतात, हे यावरून दिसून येत आहे.

कायद्याचे उल्लंघन गंभीर गुन्हा

भारतीय कायद्यात आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ शेअर करण्यावर आणि प्रसारित करण्यावर कडक शिक्षेची तरतूद आहे. सोशल मीडिया युजर्सनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, फॉरवर्ड किंवा शेअर करणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी होण्यासारखे आहे.

(नक्की वाचा- Pune School News: पुण्यातील या शाळांच्या वेळेत बदल! काय आहे कारण आणि नवीन वेळ?)

व्हिडिओ शेअर केल्यास होऊ शकते शिक्षा

आयटी ॲक्ट 2000 (IT Act 2000) च्या कलम 67 नुसार, जर एखादी व्यक्ती ऑनलाइन अश्लील कंन्टेंट पोस्ट करत असेल, तर त्याला पहिल्या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंतची जेल आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा तोच गुन्हा केल्यास 5 वर्षांपर्यंतची जेल आणि अधिक दंड होऊ शकतो.

आयटी ॲक्ट 2000 च्या कलम 67ए नुसार, जर एखादी व्यक्ती लैंगिक कृत्य स्पष्टपणे दाखवणारा कंन्टेट पोस्ट करत असेल, तर पहिल्या गुन्ह्यासाठी 5 वर्षांपर्यंतची जेल आणि 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंतची जेल होऊ शकते. याशिवाय, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292, 293 आणि 354सी देखील अश्लील कंन्टेटच्या प्रसारणावर आणि व्हिडिओग्राफीच्या गैरवापरावर कारवाई करतात.

(नक्की वाचा- Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

सोशल मीडियावरील बदनामीचा धोका

व्हिडिओ लीकच्या घटनेनंतर, अनेक लोक इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या आणि साम्य असलेल्या चेहऱ्याच्या मुलींना टार्गेट करत आहेत आणि त्यांच्या अकाऊंट्सवर अत्यंत वाईट कमेंट्स करत आहेत. या बदनामीमुळे स्वीट जन्नत (Sweet Zannat) नावाच्या एका इन्फ्लूएन्सरला सार्वजनिकरित्या समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले की, तो व्हिडिओ तिचा नाही. व्हिडिओ खुलेआम मागितला जात आहे, त्यासाठी लोक 500 ते 5000 रुपयांपर्यंतचे पैसे देण्याचे दावेही करत आहेत, जे कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे.

जबाबदार वर्तन आवश्यक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतीही आक्षेपार्ह कंन्टेंट पोस्ट करण्यापूर्वी, प्रत्येक व्यक्तीने कायद्याबद्दल जागरूक असणे आणि जबाबदारीने व्यवहार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती वैध आणि योग्य आहे की नाही, हे तपासणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com