जाहिरात
This Article is From Jun 28, 2024

कल्ला तर होणारच... नवा होस्ट, नवा सीजन; BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो रिलीज

रितेशने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता  टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला , 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सीझन गाजवायला तो सज्ज झाला आहे.

कल्ला तर होणारच... नवा होस्ट, नवा सीजन; BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो रिलीज

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा झाली आहे.  गेली दोन वर्षे प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'बिग बॅास' मराठीची प्रतीक्षा आता संपली आहे. नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सीजन नव्या अंदाजात येत आहेत. कारण नव्या सीजनचा होस्ट देखील नवा असणार आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख हा सीजन होस्ट करणार आहे. 

रितेशने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता  टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला , 'बिग बॉस' मराठीचा हा नवा सीझन गाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार आहे, हे नक्की. 

(नक्की वाचा- कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीवर विकी कौशलनं सोडलं मौन, गुड न्यूजवर म्हणाला...)

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये रितेश देशमुख होस्ट असल्याने यावेळी खूप धमाल पहायला मिळणार आहे. रितेश असल्याने यावेळचा सीझन अधिक तरूण असणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची 'लय भारी' स्टाईल पाहायला मिळत आहे. तसेच त्याचा कमाल स्वॅगही अनुभवायला मिळत आहे. रितेशची 'बॉस'गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.

( नक्की वाचा : नाना पाटेकरला मोठ्या मुलाचा का होता तिरस्कार? अडीच वर्षांचा असतानाच झालं निधन )

'बिग बॅास' हा शो प्रसिद्ध आहे तो, त्यातील अतर्क्य , अशक्य , अफलातून गोष्टींसाठी. या अशक्य गोष्टींनीच 'बिग बॅास'ला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. पण हा जितका मनोरंजक खेळ आहे , तितकाच तो एक जबरदस्त माईंड गेम आहे. रसिकांचा लाडका कार्यक्रम "बिग बॉस मराठी” चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: