Akshay Kumar : अक्षय कुमार गेल्या काही वर्षात मोठ्या पडद्यावर फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्याने अनेक फ्लॉप चित्रपटं दिली आहेत. त्यात ओएमजी 2 आणि स्काय फोर्ससारखे हिट चित्रपट देऊ शकला. मात्र तरीही त्याचा स्टारडम कायम नाही. निर्मात्यांचा त्याच्यावर विश्वास आहे. सध्या तो भूतबंगला आणि हाऊस फूल 5 चित्रपटांच्या शूटिंगची तयारी करीत आहे. आगामी चित्रपटांदरम्यान त्याने स्वत:चं एक घर विकलं आहे. यातून अक्षय कुमारला मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे. हे घर विकल्यामुळे त्याला 84 टक्के नफा झाला आहे. अक्षयचं हे घर मुंबईच्या बोरीवली पूर्वेला स्काय सिटी इमारतीत होतं. विशेष म्हणजे या वर्षभरात अक्षय कुमारने तब्बल तीन अपार्टमेंट विकली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR) च्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रानुसार, ही मालमत्ता 25 एकर जागेवर बांधण्यात आली आहे. अक्षय कुमारने नोव्हेंबर 2017 मध्ये हे अपार्टमेंट विकत घेतलं होतं. तेव्हा त्याची किंमत 2.37 कोटी रुपये होती. हे घर रिअल इस्टेट बिल्डर ऑबेरॉय रियल्टी यांनी बांधलेली स्काय सिटीमध्ये आहे. अक्षयने हे घर 4.35 कोटी रुपयांना विकून 84 टक्के नफा कमावला आहे.
नक्की वाचा - IIFA Awards 2025 : करीना कपूर शाहिदच्या दिशेने वळली, त्याला मिठी मारली आणि मग... VIDEO
आयजीआरच्या कागदपत्रांनुसार, मार्च 2025 मध्ये अक्षय कुमारचं घर विकण्याचा करार झाला आहे. या इमारतीतील 3BHK, 3BHK प्लस स्टुडिओ आणि डुप्लेक्स अपार्टमेंट्सचा समावेश आहे. हा रेडी-टू-मूव्ह-इन अशा प्रकारचं अपार्टमेंट आहे. अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्रफळ 1,073 स्क्वेअर फूट (99.71 स्क्वेअर मीटर) आहे आणि त्यात दोन कार पार्किंग स्पेसचा समावेश आहे. प्रॉपर्टी रेकॉर्डनुसार, अक्षयने हे अपार्टमेंट नोव्हेंबर 2017 मध्ये 2.37 कोटींमध्ये खरेदी केलं होतं आणि 4.35 कोटींला विकलं. यातून त्याला दोन कोटींचा नफा झाला आहे.
जानेवारी 2025 मध्येही याच इमारतीतील आणखी एक अपार्टमेंट 4.25 कोटींमध्ये विकलं होतं. हे अपार्टमेंट त्यांनी 2017 मध्ये खरेदी केलं होतं. अक्षयने जानेवारी महिन्यात आणखी एक अपार्टमेंट साधारण 80 कोटींमध्ये विकलं होतं. हे अपार्टमेंट वरळीतील 360 वेस्ट टॉवरमध्ये होतं. हे अपार्टमेंट टॉवर बीच्या 39 मजल्यावर होतं आणि त्याचा कार्पेट एरिया 6,830 स्क्वेअर फूट आहे. याशिवाय IGR मालमत्ता नोंदणी रेकॉर्डनुसार, बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मे 2024 मध्ये ओबेरॉय स्काय सिटीमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्या.