
IIFA Awards 2025 : बॉलिवूडमधील एक्स कपल शाहिद कपूर आणि करीना कपूर पुन्हा एकदा चर्चेत आहेत. शाहिद-करीनाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. या दोघांनी कित्येक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय, ज्यापैकी 'जब वी मेट' हा सिनेमा प्रचंड गाजला होता. सिनेमामध्ये शाहिद कपूरने 'आदित्य' आणि करीनाने 'गीत' हे पात्र साकारलं होते. सिनेरसिक आजही गीत आणि आदित्यच्या तितकेच प्रेमामध्ये आहेत. दुसरीकडे याच सिनेमानंतर करीना-शाहिदच्या नात्यात कायमचा दुरावा आला. ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच शाहिद आणि करीनाला एकमेकांशी संवाद साधताना पाहिले गेलंय. जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 25व्या IIFA सोहळ्यात शाहिद कपूर आणि करीना कपूर खानने एकमेकांची गळाभेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे या दोघांनी एकमेकांशी बराच वेळ गप्पाही मारल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शाहिद-करीनाची 'मन की बात'
IIFAच्या मुख्य सोहळ्यापूर्वी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान करण जोहर, कार्तिक आर्यन, कृती सेनॉन, माधुरी दीक्षित, बॉबी देओलसह शाहिद कपूर आणि करीना कपूर देखील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. थोड्या वेळाने करीना कपूर शाहिदच्या दिशेने वळली आणि तिने त्याची गळाभेटही घेतली. शाहिदनेही तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शाहिद आणि करीनाच्या चाहत्यांसाठी हा मोठा क्षण होता कारण त्यांची आवडती जोडी ब्रेकअप तसेच लग्नानंतर पहिल्यांदाच एकमेकांशी संवाद साधताना दिसत होते. आयफा सोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
(नक्की वाचा: Jab We Met Moment : शाहिद कपूर आणि करीनाची सर्वांसमोर गळाभेट Photos)
शाहिद-करीनाला एकत्र ली पाहून चाहत्यांना बसला धक्का
शाहिद आणि करीना कपूरला एकमेकांशी बोलताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण आतापर्यंत काही सोहळ्यांमध्ये या दोघांची उपस्थिती जरी दिसली असली तरीही त्यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलंय, त्यामुळे गप्पा मारण्याचा प्रश्न निर्माणच झाला नव्हता. पण IIFA अवॉर्ड्स सोहळ्यात दोघांनीही मन की बात करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
दरम्यान 16 जानेवारीला करीना कपूरचा पती आणि अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करण्यात आला होता. त्यावेळेस सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यासाठी प्रत्येक क्षणाला प्रार्थना करत असल्याची प्रतिक्रिया शाहिद कपूरने दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world