Dharmendra धर्मेंद्र-प्रकाश कौर आणि हेमा मालिनींचा तो दुर्मीळ फोटो! पहिल्यांदाच दोन्ही पत्नींसोबत एकत्र दिसले

Actor Dharmendra Photo Viral: धर्मेंद्र यांनी वयाच्या 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत पहिलं लग्न केले आणि वयाच्या 45 व्या वर्षी हेमा मालिनी यांच्याशी दुसऱ्यांदा संसार थाटला.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Actor Dharmendra Photo Viral: धर्मेंद्र, प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांचा दुर्मीळ फोटो व्हायरल"
PTI And Bollywoodtriviapc Instagram

Actor Dharmendra Photo Viral: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या खासगी जीवनामुळे कायम चर्चेत राहिले होते. त्यांनी दोन वेळा लग्न केले होतं. वर्ष 1954 रोजी वयाच्या 19 वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांनी पहिलं लग्न केलं. यानंतर वर्ष 1980मध्ये वयाच्या 45व्या वर्षी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. पण दुसरं लग्न केले तेव्हा पहिल्या पत्नीशी धर्मेंद्र (Dharmendra News) यांचा घटस्फोट झाला नव्हता, त्यावेळेस ही घटना प्रचंड वादग्रस्त ठरली होती. 

प्रकाश कौर-हेमा मालिनींचा दुर्मीळ फोटो होतोय व्हायरल | Dharmendra Prakash Kaur And Hema Malini Rare Photo Viral 

साधारणतः प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांना कधीही सार्वजनिकरित्या एकत्र पाहिलं गेलं नाही. दोघींच्या भेटीगाठीची चर्चाही कधीही ऐकण्यात आली नाही. पण सोशल मीडियावर एक अतिशय जुना आणि दुर्मीळ फोटो पुन्हा एकदा व्हायरल होतोय, ज्यामध्ये धर्मेंद्र आपल्या दोन्ही पत्नी प्रकाश आणि हेमा मालिनी यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. 

प्रकाश आणि हेमा यांच्यासोबत धर्मेंद्र एकाच फोटोफ्रेममध्ये दिसले

या ग्रुप फोटोमध्ये प्रकाश कौर आणि हेमा मालिनी एकमेकांच्या शेजारी-शेजारी उभ्या असल्याचं दिसतंय. दोघींनी साडी नेसलीय तर धर्मेंद्र यांनी फॉर्मल सुट परिधान केला होता. फोटोमध्ये आणखीही काही लोक आहेत. कदाचित ही पहिली आणि शेवटची वेळ आहे, ज्यावेळेस धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी एकत्रित कॅमेऱ्यासमोर दिसल्या होत्या.  

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra: धर्मेंद्र पहिल्या सिनेमाचा करार करताना झाले होते निराश, निर्मात्यांनी खिसा रिकामा करून दिले पैसे)

नेटकऱ्यांनी काय म्हटलंय?

फोटो पाहून काहींनी आश्चर्यही व्यक्त केलंय. एका युजरने कमेंट केलंय की, हिंदी सिनेसृष्टीचे हेच सत्य आहे. एकाने विचारलंय की, या दोघी एकत्र कशा? या दुर्मीळ फोटोला हजारो लोकांनी लाइक आणि शेअरही केलंय. सनी देओल, बॉबी देओल, अजीता, विजेता ही प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांची मुलं आहेत तर ईशा आणि अहाना या धर्मेंद्र-हेमा यांच्या मुली आहेत. 

Advertisement